file photo 
मराठवाडा

30 तासानंतरही नदीपात्रातील युवक सापडेना

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : नांदेड मुदखेड मुख्य मार्गावर असलेल्या आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरूण गोदापात्रातील पाण्यात एका तरुणाने मंगळवारी (ता. दहा) सकाळी नऊच्या सुमारास उडी मारली. मात्र त्याचा ३० तास उलटुन गेले तरी अद्याप शोध लागला नाही. जीव रक्षक दल, मच्छीमारांच्या साह्याने मुदखेड पोलिस शोध घेत आहेत.

मंगळवार (ता. १०) रोजी शेषेराव गंगाराम पांडे (वय ७२) रा. इज्जतगावबर्डी  (ता. उमरी) हे धुळवडीच्या दिवशी आपला मुलगा मारोती शेषराव पांडे (वय ३५) यास त्याच्या डोक्यावर परिणाम असल्याने दैनंदिन तपासणीसाठी नांदेड येथील रूग्णालयात बसने घेऊन जात होते. मुलगा शेषराव याने भुक लागली मला खिचडी खायची आहे असा हट्ट बसमध्येच आपल्या वडीलांकडे केला असता वडील शेषराव गंगाराम पांडे यांनी आमदुरा पाटीवर उतरूण स्थानकावर असलेल्या एका हॉटेलमध्ये खिचडी व भजे खाऊ घातले. दोघांनीही चहा घेतला. दरम्यान मारोती पांडे याने आपल्या पित्यास लघुशंका आली करूण येतो असे सांगुन बाहेर पडला. वडील हॉटेलचे बिल देऊन बाहेर पडले तोपर्यंत मारोती पांडे हा तरूण जवळच असलेल्या गोदावरी नदीवरील पुलावर पोहचला.

पालकाला वाचविले मात्र मुलगा अद्याप बेपत्ता

वडील शेषेराव हे त्याच्या मागे धावत गेले तोपर्यंत त्या तरुणाने पुलावरूण नदीपात्रात उडी घेतली. त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी ७२ वर्षीय पित्यानेही उडी मारली.  हा प्रकार आमदुरा येथील नागरीकांनी पाहताच काही लक्षात येण्या अगोदर आमदुरा येथील ग्रामस्थांनी नदीत उड्या घेतल्या. दोघा बाप- लेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलाच्या डोक्यावर असर असल्याने व त्यास पोहता येत नसल्या कारणाने नदीपात्रात कुठे फसला कळलेच नाही. गावकऱ्यांना वडील शेषेराव यांना वाचवण्यात यश आले परंतु त्या युवकाचा अद्याप शोध लागला नाही.

मुदखेड पोलिस व जीवरक्षक शोधकार्यात 

सदरील घटणेची माहीती आमदुरा येथील ग्रामस्थांनी मुदखेड पोलिसांना दिली असता सहाय्यक पोलिस निरिक्षक विश्वांभर पल्लेवाड, सपोनि नारायण शिंदे, पोलिस जमादार गंगाधर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली व ताबडतोब नांदेड येथील जीवरक्षक दलास पाचारण केले.

तीस तासापासून शोध कार्य सुरू  

सदरील घटना ही ता. १० रोजी सकाळी ९ : ३० वाजता घडली. जीवरक्षक दल व मच्छीमार, आमदुरा येथील पोहणारे युवक यांनी रात्री १० वाजेपर्यंत शोधाशोध केली. परत बुधवारी (ता.११) रोजी सकाळी सहा वाजतापासुन शोध मोहीम हाती घेतली असुन अद्यापही हा तरुण सापडलेला नाही. घटना घडुन जवळपास ३० तास लोटले आहेत. मारोती पांडे याचा शोध लागणार अशी आशा मुदखेडचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विश्वांभर पल्लेवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT