Anil nagargoje and Tushar Pawar sakal
मराठवाडा

Ahmadpur News : अहमदपूर तालुक्यात नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू

अहमदपूर तालुक्यातील शेनकुड जवळील मन्याड नदी पात्रात बुडून रविवारी (ता. 6) दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर - तालुक्यातील शेनकुड जवळील मन्याड नदी पात्रात बुडून रविवारी (ता. 6) दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील शेणकुड गावाजवळील मन्याड नदीपात्रात पूल होणार असल्याने त्या ठिकाणी खोदकाम झाले आहे. या नदीपात्रात विविध ठिकाणी वाळू काढण्याच्या अनुषंगाने खड्डे खोदले गेले आहेत.मागील आठवड्यात झालेल्या पावसाने नदीच्या पात्रात वाहते पाणी आहे.

अहमदपूर शहरात भाग्य नगर येथे राहत असलेले अनिल बबन नागरगोजे (17 वर्ष, रा.टाकळगाव शेनकुड), तुषार दत्ताराव पवार (17 वर्ष, रा. धसवाडी) दोघे मन्याड नदी पात्रात रविवारी (ता. 6) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले. नदीपात्रात उतरल्यानंतर दहा फूट अंतरापर्यंत गेल्यानंतर पंधरा ते विस फुट खोल असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते दोघे त्यात बुडाले व त्यांचा त्यात मृत्यू झाला.

पोलीस उपनिरीक्षक वैजेनाथ दिंडगे, पोकॉ राम रामोळे, चालक नारायण बेंबडे यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन दोन्ही युवकांचे मृत देह शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे आणले. या संदर्भात अहमदपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू गुन्हा नोंद झाला आहे.

नवरात्र निमित्त या घटना घडलेल्या मार्गावरून बरेच लोक राणीसावरगाव कडे जात होते, दरम्यान खंडाळी येथील मंगेश शेळके, गजानन पोळ, विशाल कसबे तर सेनकुड येथील पंकज नरवटे, वैभव नागरगोजे यांनी नदीपात्रात उड्या मारून या युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

मयत दोन्ही युवकांना पोहता येत होते. परंतु नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यांना मृत्यूने कवठाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT