अहमदपूर (जि.लातूर) : देशभरात कोरोनाची भीती असताना तालुक्यातील केंद्रेवाडी येथील कुक्कुटपालन एका व्यवसायिकांच्या कोंबड्या अचानक मरू लागल्या आहेत. यामुळे परिसरात उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांत व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे.
केंद्रेवाडी येथील सदाशिव मुरलीधर केंद्रे यांचा शिवारातील गट नंबर 99 मधे कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे. अहमदनगर येथून 800 पक्षी त्यांनी दीड महिन्यांपूर्वी आणले. शनिवारी (ता.9) दुपारपासून हे पक्षी अचानक मृत होऊ लागल्याने पक्षी वर्गीय जीवापासून मानवाला होत असलेला धोका लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनास तात्काळ माहिती सांगितली.
घटनास्थळी प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी भेट दिली आहे. कोंबड्या अचानक आशा मृत्यू पावल्याने परिसरातील नागरिकांत उलट सुलट चर्चा चालू झाली आहे.
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पक्षी पाठवण्यात येणार असून परीक्षण अहवाल आल्यानंतर या पक्षाच्या मृत्यूचे कारण समजणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये - प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी.
(edited by- pramod sarawale)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.