Ajit Pawar Beed Sabha today NCP Crisis reply to sharad pawar political news  
मराठवाडा

Ajit Pawar Beed Sabha : अजित पवारांची आज बीडमध्ये उत्तर सभा! शहरात स्वागताची जय्यत तयारी, जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

बीड : राज्यात नव्या राजकीय समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी (ता. २७) येथे होणारी राज्यातली राष्ट्रवादीची पहिलीच सार्वजनिक सभा आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या सभेची जोरदार तयारी केली असून मोठी गर्दी जमेल असेही नियोजन केले आहे.

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणाऱ्या सभेला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित राहणार आहेत.

सभेसाठी मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत. सभा यशस्वी व्हावी, यासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, बबन गवते, डॉ. योगेश क्षीरसागर आदींसह जिल्ह्यातील इतर नेत्यांवर आपापल्या भागांचा भार सोपविला आहे. सभास्थळी महिलांसाठी देखील स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली.

Ajit Pawar Beed Sabha today NCP Crisis reply to sharad pawar political news

धनंजय मुंडे यांचे विश्वासू व परळी नगर पालिकेचे माजी गटनेने वाल्मिक कराड यांच्याकडे मुंडेंच्या प्रत्येक कार्यक्रमांचे नियोजन आणि सूत्र असतात. नव्या राजकीय समीकरणानंतर अजित पवार यांची राज्यातली पहिलीच सभा त्यांचे विश्वासू शिलेदार धनंजय मुंडे यांनी आयोजित केली. या सभेसाठीचा मंडप, सजावट, कमानी, बॅनर, विविध ठिकाणचे बॅंड आणि लोकांना आणण्यासाठी वाहने तसेच पार्किंग व फराळाचे सर्व नियोजन वाल्मिक कराड यांनी केलेले आहे. सभेसाठी समोर दिसत असलेले सर्व चित्र पडद्याआड राहून श्री. कराड यांनीच चोखपणे केले आहे.

Ajit Pawar Beed Sabha today NCP Crisis reply to sharad pawar political news
Ajit Pawar Beed Sabha today NCP Crisis reply to sharad pawar political news

पवारांकडून विकासाच्या घोषणा शक्य

नव्या समीकरणानंतर शरद पवारांनी राज्यात सभा घेण्याचे जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनीही आपण प्रत्येक सभेला प्रत्युत्तर देऊ असे सांगितले. बीडमध्ये दहा दिवसांपूर्वी शरद पवारांची सभा होताच अजित पवारांची प्रत्युत्तर सभा असे जाहीर करण्यात आले. मात्र, आयोजकांनी ही सभा प्रत्युत्तर नसून जिल्ह्याच्या विकासाची, अस्मिततेची, सन्मानाची व जिल्ह्याचा कायम दुष्काळ दूर करणारी असल्याचे सांगितले. त्यामुळे या सभेत अजित पवार यांच्याकडून विकासाच्या मोठ्या घोषणांची शक्यता आहे. दरम्यान, पवार यांनी जिल्ह्यातील पक्षनेत्यांकडून विकासाचे प्रस्तावही मागवून घेतले आहेत.

विविध राज्यांतील बँडपथक आकर्षण

सभेसाठी नेते शहरात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरीची सुरुवात होईल. फेरीत स्थानिक वेशभूषा असलेले केरळ येथील खास बँड पथक, पंजाब येथील बँड पथक, जबलपूर (मध्यप्रदेश) येथील बँड पथक, त्रिपुरा येथील बँड पथक, मुंबई येथील पारंपरिक ढोल-ताशा पथक असणार आहे. फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून नेत्यांचे सभास्थळी आगमन होईल.

पोलिस बंदोबस्तही तगडा

उपमुख्यमंत्र्यांसह इतर आठ मंत्री व बडे नेते सभेला येणार असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवल्याची माहिती, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यामध्ये खुद्द पोलिस अधीक्षकांसोबत ३४ पोलिस अंमलदार, एक अपर पोलिस अधीक्षक, तीन पोलिस उपाधीक्षक, १० पोलिस निरीक्षक, ४३ सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदार, २०१ पोलिस अंमलदार, ५२ वाहतूक पोलिस तसेच ४३ पोलिस वाहने तैनात असतील.

वाहनांसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्था

सभेला मोठी गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले असून महामंडळाच्या दीडशे बससह हजारो चारचाकी व दुचाकी वाहनांतून लोक येणार आहेत. या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परळी मतदारसंघातून येणाऱ्या बसेसची पार्किंग व्यवस्था जिल्हा रुग्णालयाच्या मागील जुन्या एसपी ऑफिसच्या मैदानात असेल. तर, खाजगी वाहनांसाठी बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरासमोरील नदीपात्र मैदान, आशीर्वाद लॉन्स, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार्किंग असेल.

अहमदनगर रस्त्याने येणाऱ्या आष्टी/पाटोदा/शिरुर कासार मतदार संघातून येणाऱ्या वाहनांसाठी आयटीआय मैदान व चंपावती शाळेचे मैदान तर बीड तालुक्यातून येणाऱ्या वाहनांना माने कॉम्प्लेक्स जवळील पारस मैदानावर पार्किंग असेल. मोंढा रोडवरील फटाका मैदान तसेच जालना रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील उत्तम नगर परिसर मैदान पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT