MLA Raju Navghare sakal
मराठवाडा

MLA Raju Navghare : दहा वर्षे झोपलेली मंडळी जागी झाली; आमदार नवघरे यांची शरदचंद्र पवार गटाचे दांडेगावकर यांच्यावर टीका

आमदार राजू नवघरे यांच्या पुढाकारातून वसमत मतदारसंघात आज ठीक ठिकाणी 300 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला.

पंजाब नवघरे

वसमत - दहा वर्ष झोपलेली काही नेते मंडळी निवडणुका जवळ आल्या की जागी झाली आहेत. एवढे दिवस पूर्णा नदीवरील बंधाऱ्याच्या नावाखाली मते घेणाऱ्या मंडळींना आता मतदारसंघातील जनता आठवत आहे. कोणाच्याही सुख दुःखात सहभागी न होणारे नेते आता आपली माणसं म्हणून मतदारांना भुलवीत आहेत. अशा शब्दात आमदार राजू नवघरे यांनी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आमदार राजू नवघरे यांच्या पुढाकारातून वसमत मतदारसंघात आज ठीक ठिकाणी 300 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत राज्य महामार्ग २४९ एरंडेश्वर रिधोरा पळशी लिंगी पिंपळा चौरे बाभूळगाव आसेगाव राज्य मार्ग 29 किलोमीटरचा व 232 कोटी 80 लाख रुपये किमतीचा रस्ता कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात स्वतः आमदार नवघरे उपस्थित होते.

यावेळी सरपंच बाबुराव सोळंके, जिजाराव हरणे, बाजार समिती सभापती तानाजी बेंडे, उपसभापती सचिन भोसले, त्रिंबक कदम, बाळूमामा ढोरे, मनोज भालेराव, सुदामराव जवळेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार नवघरे म्हणाले, वसमत मतदारसंघात मागील पाच वर्षात दोन हजार कोटी कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. दोन ट्रक भरून नारळ फोडले आहेत असे माजी आमदार यांनी स्वतः कबूल केले असताना आता तेच विकास काय झाला म्हणून विचारत आहेत.

आपल्या आमदारकीच्या काळात दहा कोटी रुपयांपेक्षा एकही रस्त्याचे काम न केलेली नेते मंडळी आता आम्हाला 2000 कोटीची विकास कामे करून देखील टीका करत आहेत. कार्यकर्ता मोठा झालेला यांना बघवत नाही,कधीच कोणत्या कार्यकर्त्यांना यांनी मोठे होऊ दिले नाही असा आरोप नवघरे यांनी केला.

वसमतला शंभर खाटाचे स्त्री रुग्णालय...

वसमत येथील शंभर खाटाच्या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम भूमिपूजन शुक्रवारी आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता चिद्रावार साहेब, वैद्यकीय अधीक्षक गंगाधर काळे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप काळे, सभापती तानाजी बेंडे , विधानसभा अध्यक्ष जिजाराव हारने, सचिन भोसले, बालूमामा ढोरे, विक्रम मस्के, बालाजी तळने हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची ऑनलाईन उपस्थिती....

यावेळी आशियाई विकास बँक साह्याईत प्रकल्प महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत एरंडेश्वर रिधोरा पळशी लिंगी बाभुळगाव आसेगाव या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित त्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT