मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेटच आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनेकांना भाजपमधून बाहेर पडण्याची वेळ आली, तर त्यांना त्यांच्यापुढे कोण गेलेलं चालत नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तर यावेळी त्यांनी अजित पवार यांनी फडणवीसांमुळे शरद पवारांना सोडवं लागलं असाही आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, कधीच अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत, पण, जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणत ते तिकडे गेले, छगन भुजबळ देखील शरद पवारांना कधी सोडू शकत नाहीत, त्यांचं आणि अजित पवारांचं जमत नाही पण, देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकतील म्हणून अजित पवारांसोबत पटत नसून छगन भुजबळांना भाजपसोबत जावं लागलं असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे देखील कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत, पण नाईलाजाने त्यांना माघारी जावं लागलं, तर अशोक चव्हाणांच्या घरी ३ वेळा मुख्यमंत्री पद दिलं ते देखील कधीच काँग्रेस सोडू शकत नाहीत मात्र, त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं असंही जरांगे म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, ज्यांना जेलमध्ये पाठवलं पण, ते त्यांच्या पक्षात गेल्यावर कसं काय चांगले झाले असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले
मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.