Ajit Pawar In Latur esakal
मराठवाडा

जर कोरोना लस नाही घेतली, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

आघाडी सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारांचे लोक असुनही आमच्या पुढे फक्त महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय आहे.

जलील पठाण.

औसा (जि.लातूर) : मराठवाड्यात सर्वात जास्त वेगाने विकसित होणारे शहर म्हणून औसा पुढे येत आहे. विकासाचा ध्यास असलेला नगराध्यक्ष औसेकरांनी निवडून दिल्याने हा विकास होत असुन आगामी निवडणूकीतही औसेकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) डॉ. अफसर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना निवडून द्या. शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या शंभऱ कोटी रुपये देण्याची जबाबदारी मी घेतो. ऐतिहासिक वारसा आणि बंधू भावाने राहणाऱ्या या शहराला मी कांहीही कमी पडू देणार नाही. राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देत आहे व मी दिलेला शब्द कधी फिरवत नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) औसेकरांना दिला. शनिवार (ता.११) रोजी त्यांच्या हस्ते औसा पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ व (Marathwada) लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विकासकामांसाठी लागणारा पैसा हा जनतेच्या घामातून येतो. त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. (Deputy Chief Minister Ajit Pawar In Latur) जी कामे करीत आहोत ती दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत. (Latur)

औसा शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मराठवाड्यात पहिले राज्यात सहावे तर देशात आठवे आले होते. स्वच्छतेच्या या सवयीत सातत्य राहिले पाहिजे. माकणी पाणीपुरवठा योजना असो की, शहरातील विविध विकासकामे असतील ती अफसर शेखच्या माध्यमातून होत आहेत. याचे मला मोठे समाधान आहे. गेल्या निवडणुकीत जो समजुतदारपणा आपण दाखविला तोच याही निवडणुकीत दाखवा. सरकार आमचे आहे आणि औशावर आमचे विशेष प्रेम असल्याने निधीची कुठलीच कमतरता भासणार नाही. कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. केवळ भाषणे करुन आणि आरोप प्रत्यारोप करुन प्रश्न सुटत नसतात. आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) तीन वेगवेगळ्या विचारांचे लोक असुनही आमच्या पुढे फक्त महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपिट, कोरोना यांचा मोठ्या हिंमतीने सामना करीत हे सरकार लोकांच्या हितासाठी काम करीत आहे. औसा शहराला वेगळी दिशा आणि गती देण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या सोबत रहा. शहराच्या हद्दवाढीसाठी अफसर शेख यांनी टोकाचे प्रयत्न केले. पुढील काळात घनकचरा, नागरी सुविधा, भुयारी गटारी, पाण्याची योग्य व्यवस्था, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत स्मशानभूमी, पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन करणे गरजेचे असुन पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी झाडे लावली पाहिजेत. बकाल शहरीकरण ही राज्यापुढची मोठी समस्या आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

लस नाही घेतली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील

अगोदर डेल्टा आणि आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन झपाट्याने पसरत आहे. लातूर जिल्ह्याची दोन डोस झालेली आकडेवारी फक्त ३४ टक्के आहे व एक डोसची ७४ टक्के ही आकडेवारी निराशा जनक असुन जर लस नाही घेतली तर कठोर निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. यात कसलेही राजकारण नसुन लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याचे श्री. पवार म्हणाले. नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बाबासाहेब पाटील, बसवराज पाटील नागराळकर, आशा भिसे, विलास लांडे, सुरज चव्हाण, महोमदखान पठाण, रशिद शेख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मुख्याधिकारी वसुधा फड, संतोष सोमवंशी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT