damodar mauzo  sakal
मराठवाडा

आखिल भारतीय संमेलन उधळण्यापेक्षा 'विद्रोही'ला येण्याचे आयोजकांचे गोवेकरांना आवाहन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी गोव्यातील दामोदर मावेजो या मराठीद्वेष्ट्या कोकणी साहित्यिकाला संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले.

सचिन शिवशेट्टे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी गोव्यातील दामोदर मावेजो या मराठीद्वेष्ट्या कोकणी साहित्यिकाला संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले.

उदगीर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) संयोजकांनी गोव्यातील दामोदर मावेजो (Damodar Mauzo) या मराठीद्वेष्ट्या कोकणी साहित्यिकाला संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला (Inauguration Event) प्रमुख पाहुणे (Chief Guest) म्हणून बोलावले. म्हणून गोमंतकीय मराठी भाषीक विचाराच्या विविध संघटनांनी निषेध करुन उदगीरला येवून मराठी साहित्य संमेलन उधळणार असल्याचे इशारा दिला आहे. गतवर्षी झालेल्या नाशिकच्या आखिल भारतीय साहित्य संमेलनात एका ही महाराष्ट्रा बाहेरच्या साहित्यिकाला बोलावले नसल्याची टीका विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केली होती.

त्या पार्श्वभूमीवर घाईघाईने दामोदर मावजो या कोंकणी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील आणि त्यांच्या कंपूने ठरवले पण घाईत घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. त्यामुळे गोमंतक मराठी साहित्यिकांनी उदगीरचे संमेलन उधळण्यापेक्षा विषमतावादी विचाराच्या संम्मेलनवाल्यांविरूध्द समतेचा महात्मा फुलेंच्या भूमिकेवर आधारित विद्रोहीचा पर्याय बळकट करण्यासाठी १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या 'महात्मा बसवण्णा वचनसाहित्य नगरीतील फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचावरून साहित्याचा जागर मांडावा.असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, मुख्य संयोजक निवृत्ती सांगवे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, संमेलन मुख्य समन्वयक राजीव पाटील, कार्याध्यक्ष अरविंद पाटील, मुख्य निमंत्रक मारोती कसाब, दत्ता खंकरे, श्रीनिवास एकुर्केकर, प्रदीप ढगे, विवेक सुकणे यांनी केले आहे.

आखिल भारतीय संमेलनावर नाराज गोमन्तक मराठी साहित्यीकांना विद्रोहीचे निमंञण

१६ व्या विद्रोही संमेलनाने बहुभाषिकतेचा आदर, सांस्कृतिक बहुविधतेचा सन्मान, संविधान समर्थन व सनातनवादाला विरोध या चतुर्सुत्रीवर ठाम राहत गोव्यातील मराठी साहित्यिक इनगोवा चॅनेलचे संपादक प्रभाकर ढगे , सकाळ माध्यम समुहाच्या गोमन्तक टिव्ही चॅनेलचे सल्लागार संपादक,प्रख्यात कोंकणी भाषिक साहित्यिक शैलेंद्र मेहता यांना उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. भाषिक समानतेची संविधानिक लोकशाही प्रक्रिया पुढे नेणाऱ्या या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT