परभणी : राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून आता सर्व बाजारपेठा ता. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात फक्त किराणा, भाजीपाला, औषधी दुकान व इतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश परभणी जिल्ह्यातही लागू केले आहेत.
परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढलेला नसतानाही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी (ता. १५) आदेश निर्गमित केले आहेत. यात सर्व बाजारपेठा ता. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जीवनावश्यक वस्तू व औषधी दुकाने वगळली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना ता. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यात अत्यावश्यक सेवा, किराणा सामान, दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधी दुकाने यातून वगळण्यात आली आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही घरी बसून काम
उद्योग आस्थापनामध्ये जसे आयटी, सॉफ्टवेअर, माहिती व तंत्रज्ञान टेक्नालॉजी, सेवा आणि इतर उद्योगक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना निवास्थानापासून त्यांच्या कार्यालयीन कामे करता येणे शक्य आहे आणि त्यामुळे संबंधित उद्योग आस्थापनाच्या उत्पादन, सेवा आणि दैनंदिन कामकाजावर काही परिणाम होणार नसेल अशा उद्योग आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ता. ३१ मार्चपर्यंत घरी बसून कामे करण्याची मुभा देण्याचे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा -पोलिसांचा उन्हाळा होणार सुसहाय्य !
शाळा, कॉलेजसह शिकवण्यादेखील बंद
परभणी जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी व खासगी शाळा तसेच महाविद्यालये, सर्व खासगी शालेय व महाविद्यालयीन शिकवणी वर्ग, सर्व खासगी निवासी वसतिगृह, सर्व अंगणवाड्या, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच सर्व प्रशिक्षण केंद्र हे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चित्रपटगृह, व्यायाम शाळा, नाट्यगृहे बंद
परभणी जिल्ह्यातील साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह, तरणतलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, म्युझियम बंद ठेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.