Arjun Khotkar 
मराठवाडा

संघटनेच्या मजबुतीवर भर द्या; अर्जुन खोतकर

शिंदे गटाच्या बैठकीत अर्जुन खोतकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जालना : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची उपनेते अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक झाली. संपर्कप्रमुख माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिमन्यू खोतकर, बळवंत जाधव आदी उपस्थित होते.

खोतकर म्हणाले, पक्षाचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावरून ही बैठक घेत आहोत. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नव्या राजकीय परिस्थितीमुळे या भागात संघटना बांधणीवर अधिक भर देऊन ती बळकट करावी लागणार आहे.

गावोगाव शाखा स्थापन करण्यासह सर्वांना दौरे करावे लागतील. पक्षाचे चिन्ह घरोघर पोचवावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून द्यावे लागणार आहे. जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून त्या-त्या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांसह जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत.

जिल्ह्यांतील महत्त्वाचे स्थानिक प्रश्न, मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सरकार आपले असल्याने जनतेसह कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे एकत्रित, एकदिलाने प्रयत्न करावेत. पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केलेल्या भावना, मागण्यांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT