मराठवाडा

Ashthi News: तीन दशकानंतरही MIDC पायाभूत सुविधांच्या प्रतिक्षेत, उद्योजकांची होतेय गैरसोय

Midc News: उद्योजकांना निर्मिती केलेला माल बाहेर पाठविणे अशक्य बनले आहे.

अनिरुद्ध धर्माधिकारी

Beed: आष्टी शहराजवळ औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभा राहून तीन दशकांचा काळ लोटला तरी या ठिकाणी रस्ते, पाणी, वीजेसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे उद्योजकांचे उद्योग सुरू करण्याचे धारिष्ट होत नसून सुरू असलेल्या तीन ते चार कंपन्यांच्या उद्योजकांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

ऊसतोड कामगारांचा तालुका अशी ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील तरुणांना तालुक्यातच रोजगारनिर्मितीची व्हावी या हेतुने १९९५मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून १५ हेक्टर जागा आरक्षित करून या क्षेत्रामध्ये औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली. उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी ५३ भूखंड उपलब्ध करून देण्यात आले असून लाॅटरी पद्धतीने या भूखंडांचे वितरण करण्यात आले आहे.

मात्र, एमआयडीसीच्या स्थापनेनंतर या ठिकाणी भूखंडांचे होऊनही अद्याप कोणत्याही पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. परिसरात रस्त्यांची सुविधा नाही. अस्तित्त्वातील पायवाटाच्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे असल्याने तसेच परिसरातील पाणी रिकाम्या भूखंडांतून परिसरात सोडून दिले असल्याने उद्योजकांना निर्मिती केलेला माल बाहेर पाठविणे अशक्य बनले आहे.

विजेसाठी स्वतंत्र विद्युत जनित्राची आवश्यकता असताना ही सुविधा उपलब्ध नसल्याने थोड्याफार प्रमाणात उद्योग सुरू केलेल्या उद्योजकांनी स्वखर्चाने गावठाण हद्दीतील विद्युत जनित्रावर स्वखर्चाने पोल उभे करून जोडणी घेतली आहे. त्यामुळे अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा व तोही खंडित स्वरुपात होत असल्याने नुकसानीचा सामना करावा लागतो.

एमआयडीसीतील उद्योगांना पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसून काही वर्षांपूर्वी पाण्यासाठी एक जलकुंभ उभारण्यात आला आहे. मात्र, उभारणीपासून हा जलकुंभ कोरडाच असून त्याचीही दुरवस्था झाल्याने यात पाण्याचा संचय होणे शक्य राहिलेले नाही.

एकंदरीत एमआयडीसीला कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने उद्योजक उद्योग सुरू करण्यास धजावत नसल्याने तालुक्यातील रोजगारनिर्मिती ठप्प असल्याने युवकांना मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

काय आहेत उद्योजकांच्या मागण्या

- स्वतंत्र विद्युत जनित्राद्वारे २४ तास वीज उपलब्ध व्हावी

- अंतर्गत सिमेंट रस्ते व भूमिगत ड्रेनेज लाईनची निर्मिती करावी

- आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी वेगळे अग्निशामक केंद्र व्हावे.

- पाण्याची मुबलक उपलब्धता करून द्यावी.

- एमआयडीसीला संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT