मराठवाडा

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

संतोष कानडे

NIA Raid: देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरुन एटीएस आणि एनआयएने शनिवारी पहाटे तीन ठिकाणी छापेमारी केली. देशात अनेक ठिकाणी रेड झालेल्या आहेत. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, जालना, मालेगाव येथील काही तरुणांना पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

शनिवारी पहाटे एनआयएकडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आलेली आहे. यापूर्वीदेखील महाराष्ट्रातील संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केलेली होती.

पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

देशविघातक काम करणाऱ्या आणि जम्मू काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. नेमक्या कुठल्या लोकेशन्सवर छापेमारी झाली आणि किती तरुणांना ताब्यात घेतलं, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PESA Bhart : आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश! पेसा कायद्यातली पदे भरण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Updates : मोदीजींच बंजारा समाजाशी विशिष्ट नातं- देवेंद्र फडणवीस

Rahul Gandhi: 'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

SCROLL FOR NEXT