नांदेड : पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गुन्हेगाराला शिक्षा मिळावी यासाठी तपास यंत्रणेचे महत्वाचे काम आहे. त्यासोबतच समाजमन घडविणारे वृत्तपत्रांचा तितकाच महत्वाचा वाटा असतो. खऱ्या अर्थाने वृत्तपत्रे सामाजाचा आरसा आहेत, असे मत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केले.
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सोमवारी (ता. २३) डिसेंबर रोजी दुपारी अक वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांची उपस्थिती होती. त्यांनी महिला सुरक्षा आणि वार्तांकन या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या सुप्रीया गायकवाड, प्रा. डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, चाईल्ड लाईनच्या विद्या आळणे तसेच महिला सहाय्य कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता खर्जुले, सायबर सेलचे प्रमुख राजेश आलीवार यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थींनीची उपस्थिती होती.
गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वृत्तपत्रातील बातम्यांचे स्वरुप, तपास, शिक्षेचे प्रमाण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. कायदे, पोस्को कायदा तसेच अन्य कायद्यांच्या अंमलबजावणी करणेही सुरु आहेत. तसेच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, याच दृष्टीने पोलीस विभाग कार्य करित असतो.
कौटूबिंक हिंसाचार, आत्महत्या, समाज माध्यमातील गुन्हे, सायबर गुन्हे कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची आणखीण आवश्यकता आहे. तसेच समाजासमोर कोणत्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. तसेच पत्रकारितेतील सकारात्मकता वाढवावी. महिला अत्याचारासंदर्भात पुढे बोलतांना श्री. मगर म्हणाले की, जनजागृती, कायद्याचे ज्ञान, अपराध कमी करण्यासाठी व अपराध थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक असतात
.येथे क्लीक करा---सायबर मायाजाल..या टीप्स समजुन घ्या अन्यथा खात्यालाच बसेल कात्री.
विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांनी महिला सुरक्षा आणि वृत्तांकन करतांना पत्रकारांनी घ्यावयाची काळजी आणि भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वृत्तपत्रांनी चुकीचे वृत्त प्रसिध्द करु नयेत. वृत्तपत्रांनी सामाजिक बांधिलकी समजून वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करावे. माध्यम म्हणजेच समाजाचं प्रतिबिंब असल्याने ते जपायला हवं. पत्रकारिता ही सत्यावर आधारित असावी. खोटी नसावी, जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा व आपले उत्तरदायित्व लक्षात घेवून कार्य करावे. तसेच सोशल मिडियामध्ये “प्रथम मी” या स्पर्धेत बातम्या घाईत देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण वृत्तपत्रात बातमी देण्याअगोदर त्याचा उद्देश विसरुन जात आहोत का ? आपण कांहीतरी समाजाचं देणं लागतो यादृष्टीने कार्य करणे आवश्यक आहे. तसेच या कार्यशाळेत सुप्रिया गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.