corona vaccination in india. 
मराठवाडा

Coronavirus: लशीच्या दोन डोसनंतरही चाचणी पॉझिटीव्ह का येते? जाणून घ्या कारण

मनोज साखरे

औरंगाबाद: कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही काहीजणांची चाचणी पॉझिटीव्ह येत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात लसीबाबत शंका उत्पन्न झाल्या. परंतू सामान्यांच्या मनातील या शंकांचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांनी निरसन केले आहे. लसनिर्मितीचा अवधी, दोन डोसमधील अंतर, भिन्न व्हायरस आदी कारणांमुळे दुसऱ्या डोसनंतरही चाचणी पॉझिटीव्ह येण्याचे प्रकार घडू शकतात. तरीही सर्वांनी लस घ्यायलाच हवी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर दिला जातो. तरीही बरेच डॉक्टर्स व काही नागरीकांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. याची महत्वाची कारणे डॉ. अजित भागवत यांनी सांगितली.

१) लसनिर्मितीचा अवधी- 
कोविड प्रतिबंधक लस साधारणतः दहा ते बारा महिण्यात तयार केली गेली. कोणत्याही लस निमिर्तीसाठी सामान्यतः चार ते पाच वर्षांचा अवधी लागतो. त्यात सुधारणाही केल्या जातात; परंतू ही लस बनविण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळ नव्हता. त्यामुळे ही लस बनली तर तिची कार्यक्षमता शंभर टक्के नाही. कोविशिल्डची कार्यक्षमता ६२ टक्के आहे.

कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहितीच अद्याप समोर आली नाही. लसीची दुसऱ्या टप्‍प्यातील ८२ टक्के कार्यक्षमता असल्याचे निर्मात्याकडून सांगितले जाते. त्यामुळे लस ही शंभर टक्के परिणामकारक आहे असे नाही. लस निर्मितीसाठीचा कमी कालावधी हे महत्वाचे कारण त्यामुळे काही लोकांना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोविड झाला अशी उदाहरणे समोर येतीलच. 

२) भिन्न व्हायरस: दुसरा डोस घेतल्यानंतरही कोविड चाचणी पॉझिटीव्ह येण्याचे भिन्न प्रकारचे व्हायरस हेही महत्वाचे कारण असू शकते. व्हायरस युके, दक्षिण आफ्रिकेतील असल्यास त्या व्हायरसला आपल्याकडील लस कितपत सुरक्षा देते यावर थोडी फार शंका आहे. 

३) लसीच्या डोसमधील अंतर- 
वैज्ञानिकदृष्ट्या असे स्पष्ट झाले की, लसीच्या दोन डोस मधील अंतर तीन महिण्यांचे (बारा आठवडे) असते, तो सर्वात प्रभावी व चांगली परिणामकारकता असते. परंतू सध्या आपल्याकडे दोन डोसमधील अंतर चार आठवड्याचे आहे. तेही कारण थोड्या अधिक प्रमाणात असू शकते. 

४) हलगर्जीपणा- 
लस घेतल्यानंतर लोक हलगर्जीपणा करायला सुरुवात करतात. निर्धास्त होतात, मास्क घालण्यात थोडासा हलगर्जीपणा होतो. काळजी घेण्यात हलगर्जी हेही महत्वाचे कारण वाटते. म्हणूनच लस घेतल्यानंतरही आपण स्वतःचे कोविड विषाणुपासून संरक्षण करायला हवे. या सर्व कारणांनी आपली चाचणी पॉझिटीव्ह येते परंतू याचा अर्थ असा नव्हे की आपण लस घेऊ नये. 

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT