औरंगाबाद- रात्रीची वेळ.... घरात आजारी माणूस... अचानक रुग्णालयात न्यायची वेळ आली; मात्र वाहन मिळत नाही. रस्त्यावर दूरवर ऑटोरिक्षाही दिसत नाही. मग काय करणार, अशी वेळ कुणावरही येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत देण्यासाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या वेळात या संस्थेमार्फत शहरात 36 रिक्षाचालकांच्या मदतीने रुग्णांसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध करून दिली जातेय आणि तीही मोफत.
संस्थेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी सांगितले की, जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेमार्फत औरंगाबाद शहरातील गरजू रुग्णांना दवाखान्यात नेण्यास मदत केली जात आहे. शहरातील प्रत्येक भागातील रुग्णांना ही सेवा मिळावी म्हणून त्या-त्या भागातील रिक्षाचालकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत.
त्या-त्या भागात रुग्णांच्या मोफत सेवेत तत्पर
हेही वाचा - मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण
शहरालगतचा परिसर
इच्छुक रिक्षा चालकांना आवाहन
तसेच या सेवाभावी ग्रुपमध्ये सहभागी होऊन सेवा द्यायची असल्यास इच्छुक रिक्षाचालकांनी जिल्हाध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे श्री हळनोर यांनी आवाहन केले आहे.
हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.