Aurangabad News sakal
मराठवाडा

Aurangabad News: जिल्ह्यात थर्टी फर्स्टसाठी परमीट एकदिवसीय मद्यप्राशनासाठी ८० हजार परवाने

थर्टी फर्स्ट रोजी बार हे नवीन वर्षाच्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जालना : येत्या शनिवारी (ता.३१) वर्ष २०२२ चा अखेरचा दिवस आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे अनेकांच्या कटू आठवणी असल्याने दोन वर्ष असे निघून गेले. मात्र, २०२२ वर्ष अनेकांसाठी सुखकर गेल्यानंतर या वर्षाच्या शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक जण प्लान करत आहेत. यात तळीरामांसाठी परमीट रुम आणि देशी दारू विक्रेत्यांनी चक्क पावणेतीन लाखांचे ८० हजार एकदिवसीय परवाने विकत घेतले आहे.(Aurangabad News)

थर्टी फर्स्ट रोजी बार हे नवीन वर्षाच्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने ही मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही या परवानाधारक मद्यविक्रीच्या ठिकाणी सतत तपासणी केली जाणार आहे. जर मद्य पिण्याचा परवाना नसेल तर ग्राहकांसह हॉटेल मालकालाही दंड केला जाणार आहे. त्यामुळे दंडाची रक्कम भरण्यापेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा परवाना घेतलेला बरा अशी गत जिल्ह्यातील परमीट रुम, देशीविक्री करणाऱ्या दुकानदारांची झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एका व्यक्तीस देशी दारू पिण्यासाठी दोन रुपयांचा तर विदेशी दारू पिण्यासाठी पाच रुपयांमध्ये एकदिवसीय परवाना दिला जातो.

ऐनवेळेला परवाने कमी पडू नये, म्हणून आत्तापर्यंत तब्बल ८० हजार इतके एक दिवसीय परवाने जिल्ह्यातील परमीट रुम आणि देशी दारू विक्रेत्यांकडून घेण्यात आले आहेत. यात देशी दारूचे ४० हजार जणांचे एक दिवसाचे परवाने हे ८० हजार रुपये भरून घेतले आहेत. तर परमीट रुम मालकांनी तब्बल दोन लाख रुपये भरून ४० हजारांचे परवाने घेतले आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कचा महसूलही वाढला आहे.

थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कचे पथके स्थापन करण्यात आलेले आहे. ता.३१ डिसेंबर रोजी हॉटेल, ढाब्यांना भेटी देवून विना परवाना मद्य प्राशन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शिवाय ४० हजार देशी दारूचे व ४० हजार परमीट रुमचे एकदिवसीय परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वाटप केले आहेत.

- बी.ए. पडुळ निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

SCROLL FOR NEXT