Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शंभर कोटींच्या निविदांची लगीनघाई ; लोकसभा आचारसंहितेपूर्वी महापालिकेत लगबग,विकासकामांची प्रक्रिया महिनाभरात होणार अंतिम

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत विकासकामांच्या निविदा काढण्याची लगबग सुरू आहे. सुमारे १०० कोटींच्या निविदा आगामी महिनाभरात अंतिम होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता केव्हा लागेल, याच्या तारखा देखील चर्चेत आहे.

पाच ते १० मार्चच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या आचारसंहितेच्या कचाट्यात शहरातील विकासकामे अडकून पडून नयेत, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. एकदा का निवडणुकीची आचारसंहिता लागली की, सुमारे अडीच महिने नव्या कामांची निविदा प्रक्रिया राबविता येत नाही.

त्यामुळे त्यापूर्वीच जास्तीत-जास्त कामांच्या निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिल्यास आचारसंहितेच्या काळातदेखील कामे करता येतील, असा अंदाज बांधून महापालिकेने तयारी सुरू केली आहे. आगामी महिनाभरात सुमारे शंभर कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. शहरात सध्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत, त्याशिवाय महापालिकेच्या माध्यमातूनही कामे केली जात आहेत. त्यात शंभर कोटींच्या कामांच्या निविदा काढल्यास शहरातील विकासकामांची गती वाढणार आहे. प्रत्येक विभागाला निविदा प्रक्रिया अंतिम करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या बैठकीत जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

शासनाने केल्या अटी शिथिल

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी शासनाने निविदा प्रक्रियेतील अटी शिथिल केल्या आहेत. शंभर कोटींपेक्षा जास्त कामाची निविदा असेल तर तीस दिवस व त्याखालील कामांची निविदा असेल तर पंधरा, आठ दिवस असा वेळ ठरवून दिला आहे. त्याचा आधार घेत निविदा काढण्यात येणार आहेत.

या कामांच्या निविदा प्रस्तावित

रस्त्यांवरील बाधित पोल हटवणे, १० कोटींतून स्मशानभूमींचा विकास, सेन्सरी व ग्लो गार्डन, दिव्यांग भवनचे बांधकाम, टाकाऊ बांधकाम साहित्यावर प्रक्रिया करणे, ग्रीन वेस्ट प्रकल्प, शहरात चार ठिकाणी बस टर्मिनल उभारणे, रस्ते विकास, उद्यानांचा विकास, मोकळ्या जागांचा विकास, ड्रेनेजलाइन यासह इतर विकासकामांच्या निविदांचा यात समावेश असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : फक्त दीड किमीचे अंतर पण.. अंतरवली आणि वडीगोद्री येथे काय घडतंय? आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तंग

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah ला आणखी एक विकेट, यशस्वी जैस्वालचा भन्नाट झेल Video

Devendra Fadnavis: फडणवीसांची ओरडून भाषण करण्याची सवय बदलली याचं कारण ठरले नाना पाटेकर; काय आहे किस्सा?

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT