Electric Buse esakal
छत्रपती संभाजीनगर

Electric Bus : महापालिकेसाठी नव्या वर्षात १०० इलेक्ट्रिक बस मंजूर

छत्रपती संभाजीनगर शहरांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनातर्फे शहर वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बस पुरविल्या जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहरांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनातर्फे शहर वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बस पुरविल्या जात आहेत. पीएम बस योजनेअंतर्गत महापालिकेसाठी १०० बस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटीने प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाला पाठविला असून, जानेवारी २०२५ मध्ये शहरात नव्या शंभर इलेक्ट्रिक बस धावतील, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारने पीएम बस सेवा योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने स्मार्ट सिटीतर्फे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानुसार शंभर बस आगामी चार-पाच महिन्यानंतर मिळण्याची शक्यता आहे.

या बससाठी बसडेपो तयार करणे गरजेचे असून, वाळूज परिसरात महापालिकेला बसडेपोसाठी मिळावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यानुसार बसडेपोचा प्रस्तावदेखील केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. पीएम बससेवा योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

केंद्र सरकारनेदेखील बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. शंभर ईव्ही बसेस नवीन वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

एमआयडीसीसोबत करार

ईव्ही बसेससाठी वाळूज एमआयडीसीची आरक्षित असलेली जागा महापालिकेला मिळणार आहे. त्यासाठी लवकरच सामंजस्य करार केला जाणार आहे. स्मार्ट सिटीमार्फतच बसडेपो उभारला जाणार असून, त्यासाठी दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकतीच दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT