sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : ‘विज्ञान’चे लाखाहून जास्त विद्यार्थी ; विभागातील ४५२ केंद्रांवर घेतली जाणार बारावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून बारावीच्या परीक्षेला एकूण १ लाख ७९ हजार १४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यामध्ये जवळपास ६० टक्के विद्यार्थी विज्ञान शाखेचे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून बारावीच्या परीक्षेला एकूण १ लाख ७९ हजार १४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यामध्ये जवळपास ६० टक्के विद्यार्थी विज्ञान शाखेचे आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर व हिंगोली या पाच जिल्ह्यातून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एकूण एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये कला शाखेसाठी ५५ हजार ७३२, कॉमर्ससाठी ११ हजार ६८७, एमसीव्हीसीसाठी ३,५६१, टेक्निकल सायन्सच्या परीक्षेसाठी २५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर तब्बल एक लाख ७ हजार ७७५ विद्यार्थी हे विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाकडून जोरदार तयारी सुरू आहे. विभागातील ४५२ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावीनंतर अनेक विद्यार्थी बारावीपर्यंत विज्ञान शाखेला प्राधान्य देतात. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यास करिअरचे अनेक दरवाजे खुले होतात. डॉक्टर, इंजिनिअर, आयटी, संशोधन, एव्हिएशन, मर्चंट नेव्ही, फॉरेन्सिक सायन्स, एथिकल हॅकिंग हे पर्याय सायन्स शाखेतून बारावी झाल्यास उपलब्ध असतात. बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येते. त्याचबरोबर पीसीएम ग्रुपमधून आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनिअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी विषयाकडे वळता येते. सायन्स शाखेतूनच एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात करिअर करता येते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शाखेकडे वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT