MBBS Admission  sakal
छत्रपती संभाजीनगर

MBBS admissions : एमबीबीएसच्या कोट्यातील १५ टक्के जागा कोष्टकात

MBBS admissions : राज्यातील आठ नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस कोट्यातील १५% जागा तिसऱ्या प्रवेश फेरीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नव्याने सुरू झालेल्या राज्यातील ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या (जीएमसी) तिसऱ्या फेरीत केंद्रीय कोट्यातील १२० जागा (१५ टक्के) कोष्टकात (सीट मॅट्रिक्स) वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीत समुपदेशनासाठी सहभागी विद्यार्थ्यांना या बुलडाणा, अंबरनाथ, हिंगोली, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, जालना या जीएमसीमध्ये प्रवेशासाठी पसंती नोंदवून निवड झाल्यास प्रवेशित होता येणार आहे.

नव्या आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आवश्‍यक रुग्णालये, महाविद्यालय इमारती, वैद्यकीय शिक्षक, साहाय्यक मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) पहिल्या फेरीत परवानगी नाकारली. त्यानंतर त्रुटींची पूर्तता करून दुसरे अपील करण्यात आले. त्यावर केंद्रीय कुटुंब कल्याण महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी लेटर ऑफ परमिशन (एलओपी) द्यायला सांगितले. तोपर्यंत दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली होती.

एलओपी मिळाल्यानंतर आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नता प्रमाणपत्र मागण्यात आले असून त्यासाठी सोमवारी (ता. सात) संबंधित आठही महाविद्यालयांत पाहणी होईल. त्यानंतर संलग्नता प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्य कोट्याच्या ८५ टक्के जागा सीट मॅट्रिक्सवर वाढवण्यात येईल. ही प्रक्रिया बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन

नव्या आठ महाविद्यालयांचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता. नऊ) दुपारी दीड वाजता ऑनलाइन होणार आहे. त्यात वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना आमंत्रित करण्याचे आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.

राज्य कोट्याच्या ६८० जागा

एमबीबीएस राज्य कोट्याची दुसरी प्रवेश फेरी रविवारी पूर्ण झाली. तिसऱ्या फेरीसाठी सोमवारपासून (ता. सात) समुपदेशन प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी राज्यातील नव्या १२० जागांचा पर्याय आहे. केंद्रीय कोट्याची तिसरी फेरी १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर २० ते २३ ऑक्टोबर राज्य कोट्याची तिसरी प्रवेश फेरी होईल. त्यात राज्यातील ६८० जागांचा पर्याय उपलब्ध असेल.

एमबीबीएस प्रवेश कोट्याच्या १५ टक्के जागा एनएमसीच्या पोर्टलवर सीट मॅट्रिक्समध्ये भरल्या गेल्याने आता विद्यार्थ्यांना नव्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे एमबीबीएसचा पहिला प्रवेश महाविद्यालयात १२ ऑक्टोबरला शक्य झाला.

-डॉ. कैलास झिने, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलडाणा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सोमवारी संलग्नतेसाठी तपासणी होईल. त्यानंतर संलग्नता प्रमाणपत्र, एलओपी आणि राज्य शासनाची मान्यता एनएमसी आणि सीईटी सेलकडे पाठवून उर्वरित राज्य कोट्याच्या ८५ टक्के जागा सीट मॅट्रिक्सवर राज्य कोट्याच्या तिसऱ्या फेरीपूर्वी वाढवण्यात येतील.

-डॉ. सुधीर चौधरी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT