Pregnancy Test Chhatrapati Sambhajinagar esakal
छत्रपती संभाजीनगर

'तंत्रनिकेतन'ची विद्यार्थिनी करत होती गर्भलिंग निदान; छापा मारत अधिकाऱ्यांकडून चाचणी केंद्राचा भांडाफोड

गारखेडा भागातील एका सदनिकेत गर्भलिंगनिदान चाचणी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य विभागाच्या (Health Department) अधिकाऱ्यांनी छापा घातल्या त्यावेळी पुण्याहून आलेल्या एका महिलेच्या गर्भाचे निदान करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : ‘तंत्रनिकेतन’च्या (College of Technology) तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारी १९ वर्षीय तरुणी शहरातील गारखेडा भागात एका सदनिकेत गर्भलिंग निदान चाचण्या (Pregnancy Test) करीत असल्याच्या संशयावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने रविवारी (ता. १२) सकाळी छापा मारला. याप्रकरणी विद्यार्थिनीसह तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तरुणीचा मावसभाऊ सध्या अशाच एका गुन्ह्यात कारागृहात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

आरोग्य विभागाच्या (Health Department) अधिकाऱ्यांनी छापा घातल्या त्यावेळी पुण्याहून आलेल्या एका महिलेच्या गर्भाचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर चार तास या सदनिकेची झाडाझडती घेण्यात आली. त्यात १२ लाख ८० हजार ३३१ रुपयांची रोकड, १० मोबाईल, एक टॅब, पोर्टेबल मशिन, सोनोग्राफीसाठी लागणारे जेल असे साहित्य आढळून आले.

गारखेडा भागातील एका सदनिकेत गर्भलिंगनिदान चाचणी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोन दिवसांपासून याठिकाणी पाळत ठेवण्यात आली. रविवारी सकाळपासूनच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या परिसरात दबा धरून बसले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास एक गरोदर महिला फ्लॅटमधून बाहेर पडताना दिसून आली. त्यानंतर पथकाने या महिलेला व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला अडवून पुन्हा त्या सदनिकेत नेले. यावेळी सदनिकेत तंत्रनिकेतनच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारी एक तरुणी, तिचा लहान भाऊ, मावसभाऊ व आई असे चार जण होते.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कर्मचाऱ्यांनी घरात शोध घेतला असता १० मोबाईल, एक टॅब, एक पोर्टेबल मशिन, सोनोग्राफीसाठी लागणारे जेल आढळून आले. शिवाय एका पेटीत १२ लाख ८० हजार ३३१ रुपयांची रोकड सापडली, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांना याबाबत कळविल्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घरात सापडलेल्या साहित्यासह तरुणी व तिच्या आईला ताब्यात घेतले.

सतीश सोनवणेसोबत कनेक्शन

वाळूज परिसरात गर्भलिंगनिदान चाचणी केल्याच्या प्रकरणात जानेवारी महिन्यात सतीश बाळू सोनवणे याला अटक करण्यात आली होती. तो सध्या हर्सूल कारागृहात आहे. सतीश सोनवणे हा आज अटक केलेल्या तरुणीचा मावसभाऊ असून, ती सोनवणे याला भेटण्यासाठी वारंवार जात असल्याचे पुरावे पथकाच्या हाती लागले आहेत.

एका चाचणीचा दर १२ हजार

एका चाचणीसाठी १२ ते १५ हजार रुपये घेतले जात असल्याचा संशय आहे. चाचणीसाठी गर्भवती महिला कोणामार्फत येत होत्या, घरात आढळून आलेले मशिन तरुणीने कुठून आणले, तिला गर्भलिंगनिदान करण्याची माहिती होती का? या प्रश्‍नांचा शोध पोलिस घेत आहेत.

सहा जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. साक्षी सोमिनाथ थोरात (वय १९), सविता सोमिनाथ थोरात (वय ४३) व एक अल्पवयीन मुलगा यांच्यासह सदाशिव काकडे (वय २१), धर्मराज नाटकर (वय (३१ रा. पुणे), कृष्णा नाटकर (वय ३४ ) अशी संशयितांची नावे आहेत. डॉ. अमरज्योती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT