एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. औरंगाबाद शिवसेनेचे 4 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळं आता औरंगाबाद महापालिकेतही (Aurangabad Municipal Corporation) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय.
शिवसेनेचे 4 नगरसेवक नुकतेच शिंदे गटात दाखल आहेत, तर आणखी 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाठ, वर्षाराणी वाडकर आणि विकास जैन आदी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. 29 पैकी चार नगरसेवक उघडपणे शिंदे गटात दाखल असून येत्या काळात आणखी 10 ते 12 नगरसेवक फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळं शिवसेनेसाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काही माजी नगरसेवकही शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रामुख्यानं औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघात मोटबांधणीचं काम सुरुय. शिंदे गटाकडून इच्छुकांकडून फॉर्मही भरून घेतले असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी तसे अर्ज भरून दिले आहेत. येत्या आठवडाभरात चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.