संधिवाताच्या शंभर रुग्णांमध्ये ६० महिलांचा समावेश Sakal
छत्रपती संभाजीनगर

Rheumatic Disease : संधिवाताच्या शंभर रुग्णांमध्ये ६० महिलांचा समावेश; पावसाळ्याच्या ऋतूत काळजी घेणे आवश्यक

वयोमानानुसार वाढते वजन, बैठी जीवनशैली, दुखणे अंगावर काढण्याची सवय, व्यायाम, सकस आहाराकडे दुर्लक्षामुळे महिलांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वयोमानानुसार वाढते वजन, बैठी जीवनशैली, दुखणे अंगावर काढण्याची सवय, व्यायाम, सकस आहाराकडे दुर्लक्षामुळे महिलांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. संधिवाताच्या शंभर रुग्णांमध्ये ६० महिला रुग्ण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संधिवात म्हणजे सांधा किंवा त्याच्या आजूबाजूला दुखणे. दोन हाडांमधील हालाचालीत अडथळा आला की, सांधेदुखी निर्माण होते. जैविक घटक, गुणसूत्रांमध्ये होणाऱ्या बदलांमुळेही वातरोगाची समस्या निर्माण होते. यामध्ये अनुवांशिकता हे एक प्रमुख कारण आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हाडांची झीज अधिक असते. यामुळे संधिवाताचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळते. वयोमानानुसार वजन वाढते. त्याचवेळी घरगुती कामाचा वाढता व्याप, जबाबदारी यामुळे व्यायाम, सकस आहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होते. या कारणाने प्रामुख्याने गुडघे दुखणे सुरू होते.

थंड पाण्यामुळेही हे प्रकार वाढतात. पावसाळ्यात थंड वातावरण असल्याने स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे वातविकार वाढतात. या पार्श्वभूमीवर रुग्णांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑस्टियोआर्थरायटिस

  • सांधेदुखीचा सर्वात सामान्य प्रकार, ऑस्टियोआर्थरायटिस, यात सांध्यांची हळूहळू झीज होते.

  • लक्षणे ः सांधेदुखी, कडकपणा आणि लवचिकता कमी होणे.

संधिवात (आरए)

  • एक स्वयंप्रतिकार रोग, जेथे रोगप्रतिकारक प्रणाली चुकून सांध्याच्या अस्तरावर हल्ला करते, ज्यामुळे जळजळ आणि सांध्यांचे नुकसान होते.

  • लक्षणे ः सांधेदुखी, सूज, जडपणा आणि थकवा. हे सहसा सांध्यांना सममितीने प्रभावित करते.

सोरियाटिक संधिवात

  • सोरायसिस, त्वचेची स्थिती असलेल्या लोकांमध्ये उद्‍भवतो. या प्रकारात संयुक्त जळजळ समाविष्ट आहे. त्वचा आणि नखे प्रभावित होऊ शकतात.

  • लक्षणे ः सांधेदुखी, सूज आणि कडकपणा; तसेच लाल, खवलेयुक्त त्वचेचे ठिपके.

गाउट

  • सांध्यांमध्ये युरेट क्रिस्टल्स जमा झाल्यामुळे अचानक आणि तीव्र वेदना होतात.

  • लक्षणे ः तीव्र सांधेदुखी, लालसरपणा आणि सूज, अनेकदा पायावर परिणाम होतो.

असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय

नियमित व्यायाम, सकस व संतुलित आहार, थंड पाण्याचा संपर्क टाळावा, थंड जमिनीचा स्पर्श टाळावा, तासनतास मांडी घालून बसणे टाळावे, हरभरा डाळ, वाटाणे, बटाटे हे वातूळ खाद्यपदार्थ वर्ज्य करावे. अतिगार पाणी टाळावे, संतुलित आहार, ठरावीक वयानंतर कॅल्शिअमवाढीसाठी औषधोपचार महत्त्वाचे.

असा होतो त्रास

  • मनगट, कोपर, खांदे,

  • गुडघ्यांमध्ये सांध्यांचा त्रास.

  • सांध्यांचे दुखणे.

  • सांध्यांना सूज येणे.

  • दोन सांध्यांत आवाज होणे.

हे करावे

  • एरंडेल तेलात परतलेली सुंठ तुपाबरोबर घ्यावी.

  • लसूण, जिरे यांचा समावेश आहारात असावा.

  • जेवताना गरम पाणी प्यावे.

शंभरपैकी ६० महिला रुग्ण असतात. वातामध्ये तीन ते चार प्रकार आढळतात. यात युरिक ॲसिड वाढणे म्हणजे वातरक्त, आमवात, संधिवात, साधा संधिवात यांचा समावेश आहे. दुपारी झोपू नये, अतिव्यायाम टाळावा. जेवणात जवस, कराळ यांचा वापर करावा. कोमट पाणी प्यावे, आमवातात सुंठ सेवन करावे. मलबद्धता असेल, तर एक चमचा एरंड तेल प्यावे. काही जणांत चाळीशीनंतर गुडघेदुखी जाणवते. त्यासाठी योग्य व्यायाम, औषधोपचार घ्यावा.

— डॉ. मनोज जोशी, आयुर्वेदतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT