684 kunbi records found in chhatrapati sambhajinagar 23 Lakhs records inspection maratha reservation Sakal
छत्रपती संभाजीनगर

Kunbi Record : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळल्या ६८४ ‘कुणबी’ नोंदी; २३ लाखांवर अभिलेखांची तपासणी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या नोंदी शोधण्याचे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. जिल्ह्यात तब्बल २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६८४ अभिलेखांमध्ये कुणबी जातीची नोंद आढळली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. सध्या मराठा समाजाला आरक्षण हाच एकमेव चर्चेतील विषय आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या उपोषणानंतर उदभवलेल्या परिस्थितीनंतर शासनाकडून कुणबी जातीच्या नोंदींची माहिती घेण्यासाठी सर्व अभिलेखे तपासण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तब्बल २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखे तपासण्यात आले. महसुली अभिलेखात खासरा पत्रक , पाहणी पत्रक, क - प्रमाणपत्र, कुळ नोंदवही, नागरीकांचे राष्ट्रीय रजिस्टरे सन १९५१, नमुना नंबर ०१ हक्क नोंदणी पत्रक, नमुना नंबर २ फेरफार पत्रक , सात बाराचे उतारे अशा नोंदी तपासण्यात आल्या.

जन्म - मृत्यू नोंदी रजिस्ट्री ( गाव नमुना १४), शैक्षणिक निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर, पोलिस विभागाकडील गाववारी, गोपनिय रजिस्टर, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर रजिस्टर आदी ११ विभागातील ४४ प्रकारचे अभिलेखे तपासण्यात आले.

त्यापैकी महसुली अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारगृह अधीक्षक १६, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी व १९६७ पूर्वीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा अभिलेखात प्रत्येकी १ आणि भूमी अभिलेखामध्ये ९१ अशा एकुण कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत.

अभिलेखाचे विभाग - तपासलेली संख्या

  • महसुली अभिलेखे - १५,३५,३४७

  • जन्म मृत्यू नोंदी - १२,५५९

  • शैक्षणिक अभिलेखे - ३,५४,२११

  • कारागृह अधीक्षक - १४,२७०

  • पोलिस विभाग - १५,०५६

  • मुद्रांक जिल्हाधिकारी - ८९,४३६

  • भूमी अभिलेख विभाग - २,८८,०१९

  • जिल्हा वक्फ अधिकारी - ५६५

  • कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका - १९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT