Marathwada Workers  sakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Workers : पाच वर्षांत ६९ कामगारांनी गमावला जीव;मराठवाड्यातील कारखान्यांत अपघात

उद्योगाच्या भरभराटीसाठी कामगार सुरक्षित असणे आवश्‍यक आहे. उत्पादन प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. मागील काही वर्षांत कारखान्यांमध्ये होणारे अपघात अनेक पटींनी घटले असले तरी जे घडले त्यामध्ये ८५ टक्के अपघात हे चुकीची क्रिया केल्यामुळे.

सकाळ वृत्तसेवा

-शेखलाल शेख

छत्रपती संभाजीनगर : उद्योगाच्या भरभराटीसाठी कामगार सुरक्षित असणे आवश्‍यक आहे. उत्पादन प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. मागील काही वर्षांत कारखान्यांमध्ये होणारे अपघात अनेक पटींनी घटले असले तरी जे घडले त्यामध्ये ८५ टक्के अपघात हे चुकीची क्रिया केल्यामुळे. १५ टक्के अपघात असुरक्षित परिस्थितीने घडतात. २०१९ ते १६ मे २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील कारखान्यांत विविध अपघातांत ६९ कामगारांनी जीव गमावला. ५० जण गंभीर जखमी झाले. ३१ आगीच्या तर ५ स्फोटाच्या घटना घडल्या. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे २ हजार ३४७ कारखान्यांची नोंद आहे.

वारसांना मिळवून दिली भरपाई

मराठवाड्यातील कारखान्यात झालेल्या अपघातानंतर कामगारांच्या वारसांना व्यवस्थापन-विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळून देण्यात आली आहे. २०१९ मध्ये १६ कारखान्यांनी १९ कामगारांना ७२ लाख ६५ हजार १८९ रुपयांची भरपाई दिली. २०२० या वर्षात १२ कारखान्यांनी २० कामगारांना १ कोटी ३ लाख ७५ हजार, २०२१ मध्ये चार कामगारांना ४१ लाख ६४ हजार ८४४, २०२२ मध्ये १५ कामगारांना १ कोटी १९ लाख ६९ हजार ६८०, २०२३ मध्ये ३ कामगारांना ५२ लाख ४५ हजार १०० तर चालू वर्षात १६ मे २०२४ पर्यंत २ कामगारांना भरपाई देण्यात आली.

कारखान्यांत गुंतागुंतीची प्रक्रिया

कापड कारखाने, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी, औषधी, खत कारखाने, जंतुनाशके, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट, कागद अशा मोठ्या कारखान्यांत गुंतागुंतीची प्रक्रिया चालते. यामध्ये कारखाना आणि कामगारांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. ज्या लहान कारखान्यांत धोकादायक, विषारी, ज्वालाग्राही रसायने वापरली जातात अशांना शासनाने अधिसूचना काढून कारखाने अधिनियम लागू केला आहे. कामगारांना कामाच्या जागेची व यंत्राची सुरक्षितता, आरोग्याच्या सुविधा, कामाचे ठराविक तास, आठवड्याची सुटी, पगारी रजा अशा सुविधा मिळणे आवश्‍यक आहे.

व्यवस्थापनाकडून सानुग्रह अनुदान

कामगारांचा अपघात झाल्यास त्यांच्या वारसांना कंपनी व्यवस्थापनाने सानुग्रह अनुदान दिले. यात २०१९ मध्ये १९ कामगारांना ४१ लाख दीड हजार रुपये, २०२० मध्ये १७ कामगारांना ३६ लाख ५४ हजार २११, २०२१ मध्ये १० कामगारांना २२ लाख ५० हजार ५००, २०२२ मध्ये १८ कामगारांना ६९ लाख ९ हजार ५४३, वर्ष २०२३ मध्ये ८ कामगारांना ३६ लाखांचे कामगारांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात आले.

सर्वसाधारणपणे कारखान्यांत

  • घडणारे अपघात

  • हाताची बोटे किंवा पंजा तुटणे

  • मोल्डिंग यंत्रावर गार्डअभावी डाय व मोल्डमध्ये हात सापडणे

  • धोकादायक रसायनाची चुकीची हाताळणी

  • टेक्‍स्टाइल कारखान्यात पॉवरलूमचे शटल लागणे

  • रासायनिक कारखान्यात स्फोट

  • ॲस्बेस्टॉसच्या पत्र्यावर दुरुस्ती करताना दुखापत

  • ग्राइंडिंग. वेल्डिंग करताना डोळ्यांना दुखापत

  • स्टील कारखान्यात भाजणे

  • रासायनिक प्रक्रियेतील धोकादायक गॅसची गळती

मराठवाडा : कारखान्यांतील अपघाताची स्थिती

वर्ष प्राणघातक (मृत्यू) गंभीर जखमी आग

२०१९ १६ १७ १३

२०२० १२ ०८ ००

२०२१ १२ १० ०३

२०२२ १८ ०८ ०७

२०२३ ०९ ०५ ०८

चालू वर्ष १६ मे पर्यंत ०२ ० २ ००

अतिधोकादायक, रासायनिक, धोकादायक

प्रक्रिया, इतर कारखान्यांची संख्या

जिल्हे कारखाना संख्या

संभाजीनगर १३४९

जालना २६८

बीड २३९

लातूर १०४

नांदेड १९४

धाराशिव १०१

परभणी ५८

हिंगोली ३४

एकूण २,३४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT