70 passengers safe bus got stuck mud truck  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : समोरून ट्रक आल्याने बस चिखलात रुतली, ७० प्रवासी थोडक्यात वाचले

सरकारने महिलांना बस भाड्यामध्ये दिलेली पन्नास टक्के सवलत, ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास यामुळे बस गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असते.

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराची बनोटी-जळगाव बस (क्रमांक एम एच २० बीएल २२८६) ही बस ६० ते ७० प्रवाशी घेऊन गुरुवारी (ता.११) जळगावकडे जात होती. सोयगाव-शेंदुरणी रस्त्यावर समोर ट्रक आल्याने बस रस्त्याच्या कडेला उतरून चिखलात फसली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. सरकारने महिलांना बस भाड्यामध्ये दिलेली पन्नास टक्के सवलत, ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास यामुळे बस गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असते.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून ५६ प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी असताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून याकडे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. मुख्य रस्त्यावरील साइड पट्ट्यांचे काम निकृष्ठ झाल्यामुळे बस उलटल्याचे प्रवाशांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT