Aurangabad-ZP 
छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थी वाढले, शिक्षक घटले; जिल्हा परिषद शाळेतलं चित्र गंभीर

जिल्हा परिषद शाळेतील चित्र गंभीर ः शिक्षक, मुख्याध्यापकांची जवळपास ८०० पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोनानंतर आता शाळा सुरू झाल्या असून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. परंतु, असे असले तरी देखील शिक्षक, मुख्याध्यापकांची सुमारे ८०० पदे रिक्त असून ज्ञानदान होणार कसे? हा प्रश्न आहे. तर ही पदभरती झालेली नसल्याने कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षे शाळा बंद होत्या. या परिस्थितीतही ज्ञानदानाचे कार्य थांबले नव्हते. परिस्थितीशी दोन हात करत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा अवलंब करत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले. परंतु नव्याने आणि प्रथमच असलेल्या या ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

सेवाज्येष्ठतेनुसार दरवर्षी अनेक शिक्षक, मुख्याध्यापक सेवानिवृत्त होतात; परंतु त्या ठिकाणी रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यासाठी शासनाचे मात्र वेळकाढू धोरण आहे. याचा थेट परिणाम शाळेत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढून आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानावर होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आजघडीला तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांवर मुख्याध्यापकांची १०० पेक्षा जास्त तर शिक्षकांच्या ६५२ अशा एकूण ८०० जागा रिक्त आहेत.

दरम्यान, २०१२ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांत तर संस्थांमध्ये २०१७ पासून शिक्षक भरती बंद आहे. वास्तविक पाहता कोरोनानंतर आता शाळा सुरळीत झाल्या असून मराठी व सेमी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले आहेत. पालकांनी शासनाच्या शाळांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

अनेक वर्षांपासून शिक्षक, मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. उपलब्ध मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे ज्ञानदानाचे काम होत आहे. विद्यार्थी संख्या यावर्षी वाढली असून जिल्हा परिषदेच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर आहे. शिक्षक बदली प्रक्रियेनंतर जागा भरण्यात येतील.

- जयश्री वाघ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)

शासनाने विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकांना अतिरिक्त म्हणून घोषित केले आणि विद्यार्थी संख्या वाढल्यावर मात्र शिक्षक भरती झाली नाही. शिक्षकांच्या जागा गोठवल्या मात्र रिक्त जागा भरल्या नाहीत. शिक्षक सेवानिवृत्त, कोरोनामध्ये निधन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या वाढली आहे. शासनाने तत्काळ विद्यार्थी संख्या आधारित शिक्षक भरावेत.

- दिलीप ढाकणे, संस्थापक अध्यक्ष, आदर्श शिक्षक समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT