82 thousand 490 domestic animals benefited from Brucellosis vaccine in Chhatrapati Sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Brucellosis Vaccine : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८२ हजार ४९० पाळीव प्राण्यांना ‘ब्रुसेलॉसिस’ च्या लसीचा लाभ

‘ब्रुसेलॉसिस’ या आजाराच्या लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभासास ९१ हजार ८०० एवढी लस मात्रा प्राप्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ‘ब्रुसेलॉसिस’ या आजाराच्या लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभासास ९१ हजार ८०० एवढी लस मात्रा प्राप्त आहेत. त्यापैकी ८२ हजार ४९० एवढ्या दुभत्या जनावरांना लस देण्यात आली. आतापर्यंत ९० टक्के लसीकरण झाले. उर्वरित १० टक्के लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अभियान या मोहिमेद्वारे पशुसंवर्धन विभागामार्फत चार ते आठ महिने वयोगटातील वासरांचे लसीकरण केले जात आहे. ‘ब्रुसेलोसिस’ हा बॅक्टेरिया आहे. गाय, मेंढी, शेळ्या, डुक्कर त्याचबरोबर कुत्र्यांनादेखील या आजाराची लागण होते. यात जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या इतर गाभण जनावरांनाही या आजाराची लागण होते; तसेच जनावरांच्या गोठ्यात माणसाचाही वावर असतो. त्यामुळे श्वासावाटे ब्रुसेलोसिस या बॅक्टेरियाचा मनुष्याच्या शरीरात प्रवेश होतो.

त्यामुळे पुढे या आजाराची लागण होते. प्रामुख्याने हा जिवाणू शक्यतो दूषित अन्न, हवेमार्फत तसेच उघड्या जखमेतून पसरतो. गाभण काळाच्या शेवटच्या टप्यातील गर्भपाताने वासरू दगावते; तसेच जनावरातील दूध उत्पादनात घट होते. बाधित झालेले जनावर हे गाभण राहत नाही. वेळेवर लसीकरण तसेच योग्य काळजी घेतल्यास आजाराची शक्यता कमी होते.

आजाराची प्रमुख लक्षणे

  • शेळी-मेंढ्यातील चार ते पाच तर गाय-म्हशींच्या सहा ते आठ महिन्यांच्या गाभण काळात, गर्भपाताचे लक्षणे आढळतात.

  • गाभण जनावरांत गर्भपात न झाल्यास, प्रसूती व्यवस्थित होते. मात्र, प्रसूतीनंतर जार अडकणे, गर्भाशयाचा संसर्ग होणे, कासदाह होतो. वीर्यात जिवाणूंचा संसर्ग होतो.

पशुपालक तसेच शेतकऱ्यांनी आपला गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा, सध्या पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण सुरू आहे. ज्या जनावरांचे लसीकरण झाले नाही, अशांच्या मालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन (एफएमडी) तसेच ब्रूसेलॉसिस आजाराची लस द्यावी.

- असरार अहमद, सहायक आयुक्त पशुसंवर्धन (पोल्ट्री)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT