प्रतीकात्मक छायाचित्र. 
छत्रपती संभाजीनगर

वाळूजमध्ये नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक ठार

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर (Nagar-Aurangabad Highway) वाळूज (Waluj) जवळील टोलनाक्या लगत सोमवारी (ता.दोन) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. सचिन ज्ञानेश्वर गारकर (वय ३८, रा. तुर्काबाद खराडी ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे. तुर्काबाद खराडी येथील सचिन गारकर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन मोठी वाहने आहेत. घटनेच्या वेळी ते त्यांच्या दुचाकीवरून नगर-औरंगाबाद महामार्गाने वाळूजकडून (Accident In Aurangabad) तुर्काबाद खराडीकडे जात होते. टोलनाका ओलांडून ते निसर्ग ढाब्यासमोर आले, तेव्हा त्यांनी त्यांची दुचाकी महामार्गालगत उभी करून ते महामार्ग ओलांडून निसर्ग ढाब्याकडे निघाले.

एक मार्ग ओलांडून विरुद्ध बाजूच्या मार्गावर आले. तेव्हा भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते पक्क्या मार्गावर आदळल्याने तत्काळ बेशुद्ध झाले. धडक देणारे वाहन भरधाव निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच सचिन यांचा भाऊ नितीन गारकर व त्यांचा मित्र सिराज पठाण यांनी जखमी सचिन यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान,या प्रकरणी वाळूज पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Maharashtra Assembly Election Result : जोगेश्वरी मध्ये लोकसभेनंतर विधानसभेतही फेर मतमोजणीची मागणी, हायकोर्टात याचिका दाखल करणार

SCROLL FOR NEXT