sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणाऱ्याला पुण्यातून अटक

दोन मुलींची केली सुटका : लैंगिक छळाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक परिसरातून १५ व १६ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळविणाऱ्या तरुणाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी चाकण येथून ताब्यात घेत दोघींची सुटका केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः आरोपी रितेश अरूण चव्हाण (रा. बिबखेड, ता. लोणार, जि. बुलढाणा ह.मु.देहुगांव त. खेड जि.पुणे) या तरुणाने वाळूज महानगर एका १५ वर्षीय मुलीला २५ नोव्हेंबररोजी तर बजाजनगर येथील १६ वर्षीय मुलीला २ डिसेंबररोजी फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास सुरू असताना एका तरूणाने चाकण येथे दोन मुलींना पळवून आणल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश आघाव यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सदगुरूनगर गल्ली नंबर २, नानेवाडी चाकण येथून आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातून दोघींची सुटका केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक पुंडलीक डाके, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे, प्रियंका तळवंदे यांनी केली. या प्रकरणी रितेश चव्हाणविरूध्द लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT