marriage Chhatrapati Sambhaji Nagar News 
छत्रपती संभाजीनगर

हेलिकॉप्टर-अलिशान कारच्या काळात पठाण कुटुंबाने अनोख्या पद्धतीने सून आणली घरी; गावात...

सकाळ वृत्तसेवा

विहामांडवा (छत्रपती संभाजीनगर) : पैठण तालुक्यातील नवगाव येथे एक अनोखा पारंपरिक विवाह सोहळा पार पडला. सध्याच्या काळात लग्नसोहळा अफाट खर्च करून पार पाडला जातो. मागील काही दिवसात संभाजीनगर जिल्ह्यात वरपक्षाने वधूला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच वापरले होते.

तर अनेकजण नवरदेव नवरीला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' म्हणत आलिशान गाडयातून आपल्या घरी घेऊन जाताना दिसतात, पण नवगावातील पठाण कुटुंबियांतील लग्न सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

पठाण कुटुंबाने वरातीमधून नवरदे-नवरीला चक्क बैलगाडीतून वाजत गाजत घरी नेले. ही वरात जुन्या आठवणीला उजाळा देणारी ठरल्याने नवगाव सहपरिसरातील नागरिकांनी रस्त्यालगत गर्दी केली होती.

लग्न म्हणजे दोन जीवाचे व कुटूंबाचे मिलन असल्याने या सोहळ्याला विशेष महत्व असते. सध्याच्या काळातील लग्नसराई खर्चीक होत असताना केवळ हौस म्हणून खर्चाचा विचार न करता लग्न धुमधडाक्यात झाले पाहिजे यावर दोन्ही कुटुंबं भर देत असतात.

लग्नातील वरातीत डिजे-बॅजो, फटाक्याची आतषबाजी करण्यावर भर असतो. डिजेच्या आवाजावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकते. यामुळे जुन्या चालीरिती परंपरा लोप पावत चालली आहे.

मात्र पठाण कुटुंबाने लग्नानंतरची वरात चक्क बैलगाडीतून काढत डीजे बॅन्डला फाटा देत वाजंत्रीच्या ताफ्यातून वाजत गाजत काढत जुन्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. लग्नाची काढलेली मिरवणूक नवगावातील प्रमुख रस्त्यावरुन जाताना उपस्थितांचे डोळे दिपवणारे ठरले.

वडिलांची इच्छा होती मुलाचे लग्न जुन्या व पारंपारीक पद्धतीने करावे. त्यामुळे जुन्या पद्धतीने लग्नातील कार्यक्रम करण्यात आले. आपण कितीही मॉडर्न झालो तर जुनं ते सोनं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न यातून झाला.

ही अनोखी पद्धत गावात वापरल्याने आपण शेतकरी असल्याचे पठाण कुटुंबाने दाखवून दिले. वधूपक्षाचे आयुब, तय्यब, रशीद, पठाण रशीद हुसेन, अतिक पठाण यांचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT