sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : घृष्णेश्वर मंदिरासमोर वाहनांचा विचित्र अपघात

सुदैवाने यात जीवितहानी टळली असून दोघे जण किरकोळ जखमी झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद : वेरूळ (ता.खुलताबाद) येथील घृष्णेश्वर मंदिरासमोरील संरक्षक भिंतीजवळ शनिवारी (ता.२३) पहाटे सहाच्या दरम्यान दोन ट्रक व तीन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. यात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली असून दोघे जण किरकोळ जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास गव्हाने भरलेला ट्रक (एम.पी-१२ एच-०४०३) खुलताबादकडून कन्नडकडे जात होता. यामुळे वाहकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक कन्नडकडून खुलताबादकडे जाणाऱ्या ट्रकवर( क्र.एम.एच-२० ए.ए-७७२७) जोरात धडकला. यामुळे हा ट्रक उलटून बाजूला उभ्या असलेल्या (क्र.एम.एच-१६ बी.बी-९६९६, एम.एच-२९ व्ही.बी.१९६५, एम.एच-१२ व्ही.टी-७५७७ या तीन कारवर जाऊन आदळला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन कारला धडकल्याने या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात जिवीत हानी मात्र, दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी एम.पी.एच.०४०३ या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांनी खुलताबाद पोलिसांना कळविले. यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने धाव घेऊन येथील वाहतूक काही वेळातच सुरळीत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT