छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : कारच्या धडकेत मजूर महिला ठार, चालकाविरुद्ध गुन्हा नोंद

चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हतनूर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर नजीक उड्डाणपुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत एका पस्तीस वर्षीय मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१) रात्री घडली. शेजा पप्पू भालेराव (वय ३५ रा.दिवशी ता.गंगापूर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावरील झाडांची कापणी व गवत काढणीचे काम अनेक दिवसांपासून मजूर महिलांच्यामार्फत करण्यात येत आहे. शुक्रवारी हतनूर नजीकच्या उड्डाणपुलाजवळ महामार्गावरील दुभाजकावर झाडांची कापणी व दुभाजकावरील गवत काढणीचे काम सुरु असताना शुक्रवारी (ता.१) दुपारच्या सुमारास सदर महिलेस कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या कारने (क्र.एम.एच- ४६ बी.के-३९६३) कारने सदरील महिलेला जोराची धडक दिली.

त्यात महिला गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात दाखल केले,. यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हतनूर बिटचे जमादार कैलास करवंदे, संजय आटोळे, पोलीसमित्र संतोष ढोले यांनी घटनास्थळी धाव घेत. पंचनामा केला. अपघातग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि तात्याराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT