Ambadas Danve sakal
छत्रपती संभाजीनगर

Ambadas Danve : टक्केवारीमध्ये अडकले विद्यार्थ्यांचे गणवेश;दानवे, गुजरातच्या कंत्राटदारांना पोसण्याचे धोरण

‘‘राज्यातील सर्व शाळा शनिवारपासून सुरू झाल्या असल्या, तरी शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे ४८ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘राज्यातील सर्व शाळा शनिवारपासून सुरू झाल्या असल्या, तरी शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे ४८ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. गुजरातच्या कंत्राटदारांना पोसण्याचे राज्य सरकारचे धोरण असून, टक्केवारी ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचे गणवेश तयार झालेले नाहीत,’’ असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘सरकारी, अनुदानित शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. राज्यातील सुमारे ४८ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळेल, असा दावा सरकारने केला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. पण, टक्केवारीत अडकलेल्या सरकारने गणवेशाची निविदा अंतिम केली नाही. आणखी एक ते दीड महिना विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.’’

मराठा समाजाची साथ नाही

‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे लोक नाराज झाले. मराठा समाज भाजपच्या मागे कधीच नव्हता आणि कधी राहणारही नाही, भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष असल्याचे म्हटले जाते,’’ असा टोला दानवे यांनी लगावला.

स्मार्ट मीटर, पण वीज कुठेय?

‘‘देशातील अनेक राज्यांनी नाकारलेले मीटर आता राज्यात बसविले जात आहेत. असे कंत्राटदार महाराष्ट्रच का पाळतो,’’ असा प्रश्‍न दानवे यांनी केला. वीजबिल एक हजार रुपयाचे येते, त्यासाठी १२ हजारांचे मीटर कशाला? स्मार्ट वीज मीटर बसविले जात आहेत, पण वीज कुठे आहे? विजेअभावी शेतकरी त्रस्त आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT