Municipal Corporation  sakal
छत्रपती संभाजीनगर

Municipal Corporation : नऊ महिन्यांनंतर महापालिकेला मिळणार अकरा कोटींचा निधी;मनपाला अमृतमहोत्सवानिमित्त मिळाले होते ४० कोटी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने महापालिकेला ४० कोटींचा निधी मंजूर केला होता. नऊ महिन्यानंतर मंजूर निधीपैकी ११ कोटी महापालिकेला मिळणार आहेत. लेखा विभागाने यासंबंधी कारवाई सुरू केली आहे. मागील वर्ष मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे अमृतमहोत्सवी वर्ष होते. यात शहरात मंत्रिमंडळ बैठक, विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, मुख्य ध्वजारोहण असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यासह शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्याकरिता महापालिकेला ४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानुसार तीन दिवस कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांसाठी ४० पैकी १० कोटींचा निधी मंजूर होता. परिणामी इतर नियोजित २८ विकासकामांच्या निविदा देखील अंतिम करत कंत्राटदारांना वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. परंतु, निधी मिळाला नसल्याने कामे महापालिकेच्या तिजोरीतून टप्प्याटप्प्याने केली जात आहे. आता मंजूर निधीपैकी ११ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला असून,हा निधी महापालिकेच्या खात्यावर घेण्याची कार्यवाही लेखा विभागाने सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रस्तावित कामांसाठी पुन्हा प्रतीक्षा

सांस्कृतिक कार्यक्रमांवर १० कोटींचा खर्च झाला आहे. निधीच मिळाला नसल्याने, संबंधित बिले रखडलेली आहे. ही बिले अदा करण्यातच निधी जाणार आहे. परिणामी प्रस्तावित कामांसाठी उर्वरीत निधी मिळण्याची प्रतीक्षा प्रशासनाला करावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT