Aurangabad And Monkeys esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad | २५ माकडांचा धुमाकूळ, ७ तासांच्या मोहिमेनंतर अखेर जेरबंद

विविध भागांत सापळा रचून या उच्छाद करणाऱ्या मोकाट माकडांना सोयगाव वन विभागाने बंदिस्त केले.

ईश्वर इंगळे

सोयगाव (जि.औरंगाबाद) : सोयगाव शहरातील विविध भागांत धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडांच्या टोळक्यांना वन विभागाने तब्बल सात तासांची बचाव मोहीम राबवून २५ माकडांना बंदिस्त करण्यात सोयगाव वन विभागाच्या (Forest Department) पथकाला शनिवारी (ता.१२) सायंकाळी उशिरा यश आले. या बंदिस्त केलेल्या माकडांच्या टोळक्यांना गौताळ्याचं अभयारण्यात रात्री उशिरापर्यंत बंदोबस्तात नैसर्गिक अधिवासासाठी सोडण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी दिली. सोयगाव वन विभाग आणि औरंगाबाद (Aurangabad) येथील बचाव पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. सोयगाव शहरात विविध भागात मानवी वस्त्यात माकडांचे टोळक्यांनी आठवड्यापासून मुक्तसंचार सुरु केला होता. वनविभागाच्या लक्षात हा प्रकार येताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथून वन कर्मचाऱ्यांच्या बचाव पथकाला शहरात पाचारण करण्यात येऊन विविध भागात सापळा रचून या उच्छाद करणाऱ्या मोकाट माकडांना वनविभागाने बंदिस्त केले. (After Seven Hours 25 Monkeys Caught By Forest Department In Soygaon Of Aurangabad)

या मोहिमेत शहरातील २५ माकडे वनविभागाच्या ताब्यात येताच या माकडांना तातडीने कन्नडच्या गौताळा अभयारण्यात वास्तव्यासाठी रवाना करण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शहरातील विविध भागात आमखेडा परिसर, शहराचा मध्यवर्ती भाग, सार्वजनिक ठिकाणे, मानवी वस्त्या आणि बसस्थानक आदी भागात मोकाट माकडांच्या टोळक्याने मुक्तसंचार सुरु केला होता. या माकडाच्या टोळक्यांनी शहरात अनेकांना चावाही घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे अखेरीस वनविभागाने या माकडांना जेरबंद करण्यासाठी शनिवारी सात तास बचाव मोहीम हाती घेतली होती. सदरची कार्यवाही एस. व्ही. मंकावार (उपवनसंरक्षक, औरंगाबाद), पी. पी. पवार (सहायक वनसंरक्षक सिल्लोड), आर. जी. सपकाळ वनपरिक्षेत्र अधिकारी (सोयगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली आरआरयू टीममधील सदस्य आदीगुडे (वन्यजीव अभ्यासक), पी.सुर्यवंशी, एच.गुसिंगे, पी.अहिरे, वनरक्षक एस. टी. चेके, जी टी नागरगोजे, व्ही.आर. नागरे, एन ए मुलताने, एस. हिरेकर , कृष्णा. पाटील आदींनी यशस्वीरित्या पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT