dharashiv sakal
छत्रपती संभाजीनगर

Dharashiv News : एक रुपयाची किमया

विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : अवकाळी पाऊस व त्यानंतर बदलेल्या वातावरणाचा परिणाम पाहून शेतकऱ्यांनी विमा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात गेल्या काही वर्षाच्या तुलनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी विमा भरण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण एक रुपयामध्ये विमा काढण्याची शासनाने करून दिलेली सोय.

अवघ्या एक रुपयात विमा मिळत असल्याने विमा काढणाऱ्यांची संख्या वाढण्यात आल्याचे दिसून येत आहे. पिकांना संभाव्य धोक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या हिश्शातून शेतकरी विमा भरत असतो. यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना नाममात्र रक्कम भरण्याची सोय करून दिल्याने योजनेला अधिक चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

खरीपामध्ये तर जिल्ह्यात विमा भरण्याचे प्रमाण अधिक असतेच, पण यंदा ती संख्याही वाढल्याचे पाहायला मिळाले. रब्बी हंगामामध्ये मात्र सहसा शेतकरी योजनेमध्ये सहभाग घेत नसल्याचे चित्र आजवर दिसत होते. ते देखील यंदा बदलले असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी यामध्ये सहभागी झाल्याचे चित्र आहे. त्याची महत्वाचे कारण म्हणजे पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे संकट दिसून येत आहे. हवामान बदलाचा प्रतिकूल

पिकांवर होत आहे. त्यातून उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. साहजिकच पन्नास टक्केहून अधिक घट झाल्यास विमा मिळणे शक्य होते, त्याचा विचार करून अनेक शेतकरी योजनेकडे वळले आहेत.

एक रुपयात विमा काढण्याची सोय झाल्याने त्याचा अतिशय चांगला परिणाम दिसू लागला आहे. विमा काढतानाचा तांत्रिक खर्च वगळता शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च येत नाही. गेल्या तीन वर्षांच्या रब्बी हंगामाचा विचार केला तर शेतकरी संख्या खरीपाच्या तुलनेने अगदी नगण्य होती. यंदा ही संख्या जवळपास साडेतीन लाखाच्या घरात गेली आहे.

एक रुपयात विमा हे मुख्य कारण शेतकरी यामध्ये अधिक संख्येने सहभागी झाला आहे. पिकांना संभाव्य धोका झाला तरी काही ना काही भरपाई शासन देणारच आहे. शिवाय निवडणुकीचे वर्ष असल्याने सरकार शेतकऱ्‍यांना नाराज करणार नाही, असा विचारही शेतकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढली आहे.

- अनिल जगताप, विमा अभ्यासक

रब्बी हंगामातील तीन वर्षासह यंदाची संख्या

  • २०२० : ८६ हजार ६७३

  • २०२१ : एक लाख ४३ हजार

  • २०२२ : ४८ हजार ९८५

  • २०२३ : तीन लाख ४५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT