sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात रिक्षाचालकांच्या विविध संघटनांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निषेध

हा कायदा मागे घ्यावा, यासह विविध मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांनी हातात घेतले होते. विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा दुपारी एक वाजता धडकला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या प्रस्तावित ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात रिक्षाचालकांच्या विविध संघटनांनी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाला निवेदन दिले.

महावीर चौकातून (बाबा पेट्रोलपंप) दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरवात झाली. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. हा कायदा मागे घ्यावा, यासह विविध मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांनी हातात घेतले होते. विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा दुपारी एक वाजता धडकला. या ठिकाणी लालबावटा युनियनचे अध्यक्ष ॲड. अभय टाकसाळ, महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सलीमभाई खामगावकर, प्रकाश हेगडे, प्रशांत देशमुख, संजय हाळनोर आदींनी मार्गदर्शन केले. काळे कायदे मागे घेईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

आंदोलनातील संघटना

लालबावटा रिक्षा युनियन, महाराष्ट्र सेना, ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य परिवर्तन रिक्षा चालक मालक संघटना, भीम सेना ग्रुप, मराठवाडा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, वाय. एफ. खान रिक्षा संघटना, न्यू जनता रिक्षा युनियन, रिपाई (ए), कॉँग्रेस प्रणीत रिक्षा युनियन, संघर्ष वाहन चालक-मालक संघटना, तसेच जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारी (ता. नऊ) मध्यरात्रीपासूनच रिक्षाचालकांनी वाहने बंद केली. त्यामुळे रात्री बारानंतर रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना रिक्षा न मिळाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. संपाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. दहा) सकाळी रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, वसंतराव नाईक चौक (सिडको), हर्सूल टी पॉइंट, मुकुंदवाडी, चिकलठाणा आदी भागात रिक्षा उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या.

रिक्षाचालक अन्य वाहनधारकांना धमकावत होते, हातात काठ्या घेऊन खासगी वाहनचालकांना धमकावतही होते. काही रिक्षाचालक तर प्रवासी घेऊन जाणाऱ्या चालकांना धमकावत होते. वसंतराव नाईक चौकात बसमध्ये प्रवासी बसवल्याने रिक्षाचालकांनी प्रवाशांना बाहेर ओढून काढले, एका प्रवाशाशी हुज्जत घालत त्याचा मोबाइल रिक्षाचालकांनी फोडून टाकला.

शोधाशोध आणि पायपीट

  • रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको स्थानकात प्रवाशांची पायपीट

  • महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी करीत होते वाहनाची शोधाशोध

  • सर्वसामान्य प्रवाशांना पाठीवर, खांद्यावर ओझे घेऊन पायी जाण्याची वेळ

  • शाळेत रिक्षाने जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मारावी लागली शाळेला सुटी

  • काही पालकांना दुचाकीवरून विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT