sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : सावधान! बिबट्या शहराच्या वेशीवर

लांझी-हिरापूर शिवारात शेळी फस्त

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : लांझी-हिरापूर शिवारातील शेतवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी मृत्युमुखी पडली. तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

वाळूजलगतच्या लांझी-हिरापूर शिवारात नानासाहेब देवकर यांची शेतवस्ती (गट क्रमांक ७०) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते कुटुंबासह शेतवस्तीवर राहतात. घटनेच्या दिवशी भल्या पहाटे तीन वाजेपासून त्यांची कुत्री जोरजोरात भुंकत होती. दीड ते दोन तास उलटूनही कुत्री भुंकण्याचे थांबेना. त्यामुळे देवकर यांच्या लगतच्या शेतवस्तीवरील कांताबाई आधाने घराबाहेर आल्या. तेव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते. ज्या भागाकडे कुत्री भुंकत होती तिकडे त्यांचे लक्ष गेले, तेव्हा त्यांना अंधारात पुसटसे काहीतरी पळून जाताना दिसले. त्यांनी ही माहिती देवकर कुटुंबियांना दिली.

देवकर घरातून बाहेर आले, तेव्हा त्यांना घरासमोरील शेळी गायब तर शेळीचा मोठा बोकड खाली निपचित पडलेला दिसला. त्यांनी जवळ जाऊन बघितले तेव्हा बोकडाच्या गळ्याला चावा घेतलेच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे बोकड गतप्राण झाला. तर शेळीला ओढत उसाच्या शेताजवळ नेले.

मात्र, कुत्र्यांचे भुंकणे तसेच आधाने या शेतकरी महिलेने देवकर कुटुंबाला दिलेल्या आवाजामुळे घटनास्थळावरून बिबट्याने शेळीला सोडून देत धूम ठोकली. देवकर जेव्हा शेळीजवळ गेले, तेव्हा शेळी प्रचंड घाबरलेली होती. तर तिचा गळा चावल्याने रक्तप्रवाह सुरू होता. गंभीर जखमी असलेल्या शेळीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार करण्यात आले. बोकडाचे रक्त पिऊन बिबट्याने शेळीवर हल्ला चढविल्याचे देवकर म्हणाले. बोकडाच्याही गळ्याला मोठ्या प्रमाणावर दात लागल्याच्या खुणा दिसून आल्या.

शेतकऱ्यांमध्ये दहशत

बिबट्याच्या हल्ल्याची माहिती परिसरातील शेतवस्त्यांवर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या रब्बी हंगामात सुरू आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मोहरी पिकांच्या पेरण्या तर उस लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाचे प्रामुख्याने शेतीतच वास्तव्य आहे. त्यात बिबट्याचा हल्ला शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा विषय झाला आहे. वनविभागाने परिसराची पाहणी करून उपाययोजना करावी, असे शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT