Attendance Bot sakal
छत्रपती संभाजीनगर

Attendance Bot : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीसाठी जिल्ह्यातील ७० टक्के शाळा उदासीन

खासगींकडून दुर्लक्ष; शिक्षकांमध्ये प्रशिक्षण, जागृतीचा अभाव

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने विद्या समिक्षा केंद्रांतर्गत अटेन्डन्स बॉट (चॅटबॉट) या ॲपवर एक डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, प्रशिक्षण व जनजागृती अभावी जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के शाळांनी अद्यापही विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन उपस्थिती नोंदणीला सुरवात केलेली नाही.

जिल्ह्यात जवळपास ४ जहार ४९० शाळांमध्ये १ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन घेण्याच्या सूचना होत्या. त्या संदर्भात काही मुख्याध्यापक, शिक्षकांना देखील ऑनलाइन प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात येते.

परंतु जिल्ह्यातील ऑनलाइन उपस्थिती नोंदणीची परिस्थिती पाहता शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांना व्यापक प्रशिक्षणाची, त्याबाबतच्या जनजागृतीची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.

अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांना तर सोडाच मुख्याध्यापकांनी देखील याबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यासाठी वर्गशिक्षकांना शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला क्रमांकाचाच मोबाइल वापरावा लागत आहे. सध्यातरी ज्या वर्ग शिक्षकांना शालार्थ आयडी आहेत, त्यांनाच ही उपस्थिती नोंदवता येत आहे.

ऑनलाइनबाबत अडचणींचे डोंगर

अगोदरच मुख्याध्यापकांना शाळा सुरू झाल्यानंतर मिड डे मील, मासिक देयके, यू डायस प्लससह अनेक योजनांची माहिती, पत्रके ऑनलाइन भरण्याचा ससेमिरा मागे लागलेला आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

आता ऑनलाइन हजेरीसाठी प्रामुख्याने मोबाइल नेटवर्क प्रश्न आहे. काही ठिकाणी विजेचा देखील प्रश्न आहे. त्यामुळे देखील ऑनलाइन उपस्थिती दर्शविण्याऱ्या शाळांची टक्केवारी कमी असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

शाळांनी उपस्थिती नोंदविणे आवश्‍यक

जिल्ह्यात १ ते १० वीची विद्यार्थी संख्या ५ लाख ४० हजारांच्या आसपास आहे. जवळपास ३० टक्के शाळांनीच नोंदणीला सुरवात केल्याची माहिती आहे. त्याही बहुतांश शाळा जि. प. च्या आहे.

याचा अर्थ अजूनही जिल्ह्यातील खासगी शाळांना याबाबत फारशी माहिती नाही. माहिती असली तर याबाबत प्रशिक्षण नसल्याचे दिसून येत आहे. उर्वरित शाळांनी ऑनलाइन उपस्थिती नोंदवणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT