औरंगाबाद : केंद्राकडून राज्याला लस मिळाल्यानंतर औरंगाबादच्या (Aurangabad) ११५ वार्डात लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र लसीअभावी अनेक केंद्रे (Corona Vaccination Sites) बंद पडले आहे. राज्य सरकारतर्फे नियोजन नसल्यामुळे सर्व घडले. आगामी काळात मुंबईतील महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) डोळ्यासमोर ठेवून जास्तीत-जास्त लसीकरण मुंबईला आणि जालन्याला (Jalna) देण्यात येत आहे, असा आरोप भाजपचे आमदार अतुल सावे (Atul Save) यांनी सोमवारी (ता.दहा) पत्रकार परिषदेत केला. श्री.सावे म्हणाले की, केंद्राने लोकसंख्येनुसार राज्यांना लसींची वाटप केले. मात्र राज्यातर्फे लसीकरण वाटपात भेदभाव करण्यात येत आहे. जिथे गरज नाही तिथे जास्त लस देण्यात येत आहे. (Atul Save Said Large Number Corona Vaccination In Mumbai Because Of Municipal Election)
राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा ही तुटवडा आहे आणि आता ऑक्सिजनची परिस्थिती ही वाईट आहे. दोन दिवसांपूर्वी एका रूग्णालयातील ऑक्सिजन संपले होते. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यासाठी पुरेसा ऑक्सिजन असल्याची खोटी माहिती उच्च न्यायालयात सादर केले जात आहे, असा आरोपही आमदार अतुल सावे यांनी केला. केंद्र सरकारने दिलेल्या दीडशे व्हेंटिलेटर काम करत नसल्याचे सांगण्यात आले. या विषयी विचारले असता श्री.सावे म्हणाले की, केंद्रातर्फे केवळ औरंगाबादलाच नव्हे, तर मराठवाड्यासाठी व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मिनी घाटीला दिलेले व्हेंटिलेटर सुरू आहे. तरी इतर ठिकाणी दिलेली ही सुरु आहे. घाटी तिलाच व्हेंटिलेटर का बंद आहेत हे आम्ही मंगळवारी (ता.११) टेक्निशियनला घेऊन जात तपासणार आहोत, असेही श्री. सावे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजय केणेकर, भगवान घडामोडे, अनिल मकरिये, राजेश मेहता, राम बुधवंत आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.