MP Bhagwat Karad 
छत्रपती संभाजीनगर

धरसोड वृत्तीतून घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढला - भागवत कराड

संजय जाधव

कन्नड (जि.औरंगाबाद) : गेल्या वर्षभरात राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्रात कोणत्याही सुविधा वाढवल्या नाहीत. डॉक्टर व नर्सचे रिक्तपदे भरले नाहीत. नागरिकांना दमडीचीही मदत केली नाही आणि आता धरसोड वृत्तीतून घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढला. हे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार आता कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण करत आहे. केंद्र शासनाकडून आवश्यक प्रमाणात लसपुरवठा केली जात असून नागरिकांनी लसीकरण महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन खासदार डॉ. भागवत कराड यांनी कन्नड येथे केले.


शहरातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (ता.नऊ) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर बापू घडामोडे, डॉ.संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, काकासाहेब तायडे, भगवान ठाकरे, सुभाष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री कराड म्हणाले की, राज्यातील तीनचाकी सरकार समन्वयाचा अभावामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. लॉकडाऊन असो की लसीकरण शासनाकडून स्पष्ट धोरण राबवले जात नाही. केंद्र शासनाकडून लस पुरवठाबाबत राज्य शासनाकडून चुकीची व खोटी माहिती पुरवली जात आहे. वास्तविक महाराष्ट्राला १.६ कोटी लस मात्रा दिल्या. त्यातील ९१ लाख वापर करण्यात आल्या. प्रशासन व शासनामध्ये समन्वय नसल्याने अनेक जिल्ह्यात लसीची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या घडीला लसीचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लसीकरण अपेक्षित आहे.

धरसोड निर्णयामुळे कोरोना वाढला : लॉकडाऊन लावण्याबाबत शासनाने आतापर्यंत किती वेळा निर्णय बदलले? कधी विकेंडला लॉकडाऊन, कधी अंशतः लॉकडाऊन, आता ब्रेक द चेन असे धरसोड निर्णय सरकार घेत असल्याने कोरोना वाढल्याची घणघाती टीक श्री. कराड यांनी केली. या निर्णयात नागरिक, व्यापारी संघटनांना सरकार विश्वासात घेत नाही. आता आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. केंद्राचा लस पुरवठ्यात कोणताही दुजाभाव नाही. पुरेशा प्रमाणात लस वेळोवेळी उपलब्ध होईल. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, अफवांवर विश्वास न ठेवता लसीकणार महोत्सवात, लस घेऊन सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. 

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT