Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणार ५४० कोटींचा निधी

तब्बल १४७ एकराचे करावे लागणार भूसंपादन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून, दक्षिण बाजूने १४७ एकरावर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन कायद्यानुसार ४६५.८५ कोटी तर खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी केल्यास ५४०.४ कोटींचा निधी लागणार आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अनेक वर्षांपासून हालचाली सुरू आहेत. याठिकाणी मोठ्या क्षमतेच्या विमान उतरण्याची सुविधा द्यायची असेल तर धावपट्टी १२ हजार फुटापर्यंत लांब करण्याचा निर्णय विमानतळ विकास कंपनीने घेतला आहे. यापूर्वी २०२० मध्ये उत्तर बाजूने १८२ एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य विमानतळ विकास कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन मोजणीसाठी रीतसर मोजणी शुल्कही दिले.

दोन टप्प्यात ही मोजणी पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने जागेच्या भूसंपादनासाठी खासगी वाटाघाटीनुसार ५६८ कोटी तर भूसंपादन कायद्यानुसार २१५ कोटींचा निधी लागेल. शिवाय घरे, इमारतींच्या बांधकाम मोबदल्याचा विचार केल्यास मोबदल्याची रक्कम हजार कोटींवर जाईल, असे कळविले. त्यानंतर दक्षिण बाजूने भूसंपादनाचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिधिंया यांच्याकडे सादर केला. राज्य विमानतळ विकास कंपनीने दक्षिण बाजूने १४७ एकर जमीन मोजणीचे पत्र जिल्हा भूमिअभिलेख विभागाला दिले. त्यानुसार मोजणी प्रक्रिया पूर्ण करून उपअधिक्षक दुष्यंत कोळी यांनी हा अहवाल भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना सादर केला आहे. या अहवालात आठ एकर जागा सिडकोची तर १३९ एकर जमीन खासगी आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

फळझाडे, इमारतीसाठी लागणार ५० कोटी

जागेच्या भूसंपादनासाठी कायद्यानुसार ४०३ कोटी ७५ लाख तर खासगी वाटाघाटीनुसार ४७६ कोटी १२ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. घरे फळझाडे, विहिरी, बोअरवेल आणि इमारतींसाठी ५० कोटी रुपये व इतर प्रक्रियेसाठी १२ ते १४ कोटी रुपये लागणार आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

SCROLL FOR NEXT