Aurangabad Congress taluka president Ramukaka Shelke join BJP 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामुकाका शेळके यांचा भाजपात प्रवेश

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह अनेक समर्थकांच्या प्रवेशाने काँग्रेसमध्ये खळबळ

संतोष शेळके

करमाड : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीनाताई शेळके व त्यांचे पती तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव उपाख्य रामुकाका शेळके यांनी गुरुवारी पक्षाची साथ सोडत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, श्री शेळके यांचा हा अचानक जाहीर केलेल्या निर्णय माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या शहरातील उस्मानपुरा येथील जिल्हा कार्यालयात दुपारी तीन वाजता आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, औरंगाबाद तालुक्यात डॉ. काळे यांच्या सोबत मागील दोन वर्षात काँग्रेस पक्षासाठी श्री. शेळके यांनी मोठे काम केले. तसेच डॉ. काळे नंतर तालुक्यातील मोठा चेहरा म्हणून रामुकाका यांच्याकडे बघितले जाते. असे असतानाही त्यांनी अचानक पक्ष त्यागाचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या घेतलेल्या निर्णयाची गुरुवारी सोशल मीडियासह सर्वत्र दिवसभर चर्चा सुरू होती. त्यांच्या समर्थकांसह सानिध्यात असणाऱ्यांचे सारखे फोन सुरू होते. 'हो तुम्ही ऐकले ते खरे आहे' असे सांगताना समर्थकांची चांगलीच दमछाक उडाल्याचे दिसून आले.

रामुकाका हे माजी आमदार केशवराव औताडे गटाचे मानले जात असले तरी त्यांनी सुरुवातीपासुनच डॉ काळे यांच्याशीही चांगलेच जुळवून घेतल्याचे तालुक्यातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय अचानक घेतला की खूप दिवसांपासुन हे शिजत होते अशी खुमासदार चर्चा चवीने गावागावात चर्चीली जात आहे.

काँग्रेस पक्षात श्री शेळके यांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील गावागावात त्यांनी पक्षवाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहे. सत्तेत असताना व नसताना त्यांनी तालुक्यात काँग्रेसची मोठी फळी निर्माण करताना युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकर्षित केले. असे असताना त्यांनीच पक्षाला अचानक अशी सोडचिठ्ठी दिल्याने

अनेक्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता, कुंभेफळचे सरपंच, तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष, विद्यमान तालुका कमिटीचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला. पुढे त्यांच्या पत्नी मिनाताई शेळके या जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण सभापती व नंतर अध्यक्ष बनल्या.

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष बदलल्याने त्यांना भाजपमधुन काय अपेक्षित आहे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय शिंदे सरकारने, आघाडी सरकारने जाहीर केलेले आरक्षण रद्द केल्याने पुढे कुठल्या गटात व कुठल्या गणात काय आरक्षण राहील व तेंव्हा काय राजकीय आखाडे मांडले जातील हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान, श्री शेळके यांच्या भाजप प्रवाशाने आज मात्र त्यांच्या समर्थकांसह आजपर्यंत विरोधक म्हणून पुढे उभ्या ठाकणाऱ्यासमोर 'आता पाहिले कोण' असे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने मोठी गोची झाल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT