Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

शेतीचा वाद जीवावर बेतला, वैजापूर तालुक्यात कुऱ्हाडीने केलेल्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू

भानुदास धामणे

वैजापूर (जि.औरंगाबाद) : वैजापूर तालुक्यातील नाराळा शिवारा (वाघला) येथे शेतवस्तीवरील राहत्या घरात घुसून तिघांना मागील चार वर्षांपूर्वीच्या शेती वादातून कुऱ्हाडीने मारहाण केली. यात गंभीर जखमी  वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तालुक्यातील नाराळा शिवारातील  गट नंबर १७८ मध्ये शेतवस्तीवर मंगळवारी (ता.३०) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक घरात घुसून आरोपींनी कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केले. जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने या तिघांनही औरंगाबाद येथील घाटी हलविण्यात आले.

यामध्ये शंवताबाई भिवाजी सोमासे यांचा उपचारादरम्यान रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला असून भिवाजी किसन सोमासे व कविता रविंद्र सोमासे यांचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी भिवाजी किसन सोमासे (वय 80), शेवंताबाई भिवजी सोमासे (वय 72)  व कविता रविंद्र सोमासे (वय 36 , रा नाराळा शिवार गट नंबर 178) यांना आरोपी शिवाजी किसन सोमासे (वय 80), जनाबाई शिवाजी सोमासे (वय 75),  लक्ष्मण शिवाजी सोमासे (वय 32), कृष्णा शिवाजी सोमासे (वय 30), आशाबाई लक्ष्मण सोमसे (सर्व रा.नारळा शिवार गट नंबर 178) यांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन हे सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधवर व पोलिस काॅन्टेबल महेश बिरुटे हे करित आहेत. या घटनेची परिसरात व हळहळ केली जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT