paisa photo.jpg 
छत्रपती संभाजीनगर

BIG NEWS : औरंगाबादेत चलनातून बाद झालेल्या तब्बल ९९ लाखांच्या नोटा जप्त, गुन्हे शाखेने चौघांना घेतले ताब्यात

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी जालना रोडवरील हॉटेलात थांबलेल्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी बँकर्स बनून पकडले. या चौकडीकडून पोलिसांनी तब्बल ९८ लाख ९२ हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी प्रियांका सुभाष छाजेड (वय ३०, रा. कामगार कॉलनी, महाराष्ट्र बँकेजवळ, चिकलठाणा), नम्रता योगेश उघडे (४०, रा. देवानगरी, जाबिंदा इस्टेट), मुश्ताक जमशीद पठाण (५३, रा. टाइम्स कॉलनी, कटकटगेट) आणि हशीम खान बशीर खान (४४, रा. लक्ष्मण चावडी, मोंढा रोड) या चौघांना मंगळवारी (ता. ३०) रात्री ताब्यात घेतले. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार व पाचशेच्या नोटा बदलण्यासाठी चौघेजण जालना रोड, सिंधी कॉलनी येथील हॉटेल ‘ग्लोबल इन’मध्ये थांबल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी योजना आखली. गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी बँकर्स बनले. आपण बँकेचे कर्मचारी आहोत, असे भासवून चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देतो, असे त्यांनी सांगितले.

त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या चौकडीने एक कोटीसाठी पंधरा लाख रुपये देण्याची मागणी केली. यादरम्यान पोलिसांनी जुन्या नोटा असल्याची खातरजमा केली. त्यानंतर बुधवारी दुपारी सापळा रचत पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक फौजदार नितीन मोरे, पोलिस नाईक भगवान शिलोटे, विलास वाघ, प्रभाकर म्हस्के, विशाल पाटील, आनंद वाहूळ, नितीन देशमुख, विरेश बने, संदीप सानप, प्रभाकर राऊत, अश्वलिंग होनराव, परवेज पठाण, गजानन डुकरे, संजीवनी शिंदे, आशा कुटे व ज्ञानेश्वर पवार यांनी छापा मारून या चौकडीला पकडले. त्यांच्या ताब्यातून एक हजाराच्या एकूण नऊ हजार सहाशे दहा तर पाचशेच्या ५६५ नोटा असे एकूण ९८ लाख ९२ हजार पाचशे रुपये हस्तगत केले. तसेच ३७ हजारांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 
 

शोधायचे ग्राहक 
नम्रता उघडे आणि प्रियांका छाजेड या दोघींना पठाणने हाताशी धरले होते. या दोघींच्या मदतीने पठाण हा नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहक शोधत होता. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिसांनी बँकर्स बनून या चौकडीला पकडले. 

पठाणचा व्यवसाय जुन्या गाड्या विक्रीचा 
पठाण हा जुन्या गाड्या विक्रीचा व्यवसाय करतो. तर नम्रता उघडे ही प्लॉटिंगचा व्यवसाय करते. नोटांसंदर्भात पोलिसांनी पठाणकडे चौकशी केली; मात्र तो नोटा आपल्याच असल्याचे पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तपासावर पोलिसांनी भर दिला आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या नोटा कोठून आणल्या याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT