Cha. Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Cha. Sambhaji Nagar: बिडकिन येथील जिल्हा बँक फोडण्याचा केला प्रयत्न... वाचा पुढे काय झाले?

Bank Robbry: बॅंकेच्या मीटर कनेक्शन बंद ही करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले होते.

सकाळ वृत्तसेवा

Bidkin: येथील ग्रामपंचायत कार्यालय शेजारी असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा येथे चोरी झाल्याची घटना घडल्याची माहिती काल दि.१९ बुधवार रोजी अंदाजे ११:३० च्या दरम्यान घडली आहे.

आज दि.20 रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी सर्जेराव राजाळे यांनी सकाळी अंदाजे ८ ते ८:३० वाजे दरम्यान खिडकी,चॅनल गेट आणि दरवाजे तोडलेल्या स्थितीत असलेले पाहताच शाखा व्यवस्थापक खराद यांना कळविले व स्थानिक बिडकिन पोलिस ठाणे यांना कळविले होते.

सदरिल घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नारायण गिते, पोलिस नाईक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पुढिल कार्यवाही करिता वरिष्ठांना कळविण्यात आले असतानाच श्वानपथक व ठस्से तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन्ही चॅनल गेट व दरवाजे यांचे कडी कोंडे तोडुन कुलुप काढुन‌ बॅंकेत घुसखोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.सुरक्षितपणे लॉकर मधील तिजोरीत असलेले पैसे तिजोरी न उघडल्याने व्यवस्थीपणे आहेत अशी माहिती पोलिसांनी व शाखा व्यवस्थापक यांनी दिली आहे.

चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने लॉकरचा दरवाजा तोडला मात्र तिजोरी चा कोंडा न उघडल्याने तिजोरी उघडली नाही.चोरट्यांनी प्रयत्न करत तिजोरी चा कोंडा हि तोडला असता प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने घटनास्थळावरून पसार झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.‌

यावेळी घटनास्थळी ठस्से तज्ञ सहायक पोलिस निरीक्षक पठाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर आढे,जाधव आणि श्वान रॉकी सोबत श्वानपथक टिम पोलिस उपनिरीक्षक, लकर्णी,तळेकर,कराळकर,पंकज दळवी,बिडकिन पोलिस ठाणे येथील सहायक फौजदार अशोक सोकटकर, मधुकर निकाळजे, पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमान धनेधर, पोलिस नाईक संजय चव्हाण, पोलिस कर्मचारी राहुल बल्लाळ यांनी घटनास्थळी पाहणी करत सर्व ठिकाणाचा पंचनामा करत परिश्रम घेतले.

बिडकिन पोलिस ठाणे येथे शाखा व्यवस्थापक अधिकारी प्रल्हाद नानासाहेब खराद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७,३८०,५११ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नारायण गिते हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT