औरंगाबाद : शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष आणि कुरघोडीचे प्रकार राज्यात सुरुच आहेत. युवा सेनेचे उपसचिव असलेले राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जंजाळ यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केली. या निवडीनंतर सोमवारी भाजपच्या विभागीय कार्यालयात आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जंजाळ महायुतीचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांचा सत्कार केल्याची प्रतिक्रीया भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. यावेळी भाजप आणि शिंदे गटातील जिल्हाध्यक्षांचे वेगवेगळ्या विषयांवर खलबते झाली.
भाजपतर्फे साहित्यरत्न शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उत्सव समितीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी या कार्यकारिणीत शिंदे गटातील राजेंद्र जंजाळ यांनाही स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या भेटीत भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर आणि जंजाळ यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली. यावर आमदार अतुल सावे म्हणाले, की जंजाळ यांची मुख्यमंत्र्यांनी निवड केल्यानंतर सत्कार करायचा होता. मात्र ते मुंबईत असल्यामुळे करता आला नव्हता. ते शहरात आल्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार केला. आता लवकरच बैठक घेणार असून अनेक जण आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचे जंजाळ यांनी सांगितले. केणेकर-जंजाळ यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली.
मुख्यमंत्री शिंदे ३१ जुलैला जिल्ह्यात
शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिंदे गटातील आमदारांतर्फे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ३१ जुलैला शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद, मध्य आणि पश्चिम व पैठण या त्यांच्या गटातील आमदारांच्या मतदारसंघात येणार आहेत. यात काही विकास कामांचे उदघाटन करण्यात येणार असल्याचेही जंजाळ यांनी सांगितले. किशोर शितोळे, राजेश मेहता, रवी एडके, राम बुधवंत यांची उपस्थिती होती.
दीड वर्षांत पाणी योजना पूर्ण होणार : सावे
आधी प्रत्येक गोष्टीत आम्हाला डावलले जात होतो. डीपीडीसीच्या निधीतही तोकडा निधी देते होते. तो आम्ही घेतला नाही. शहराला निधी मिळाला नाही. सरकार बदल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला गती आली. वीस दिवसात ६ किलोमीटरची लाईन पूर्ण झाली. जलद गतीने हे कामे सुरु असून दीड वर्षांत ही पाणी पुरवठा योजना पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार अतुल सावे यांनी दिली. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत मुंबईत बैठक नियोजित करणार असल्याचीही माहिती आमदार सावेंनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.