‘मेक इन औरंगाबाद’च्या इलेक्ट्रिक झेंड्यांनी लक्ष वेधले आहे.  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : विद्युत रोषणाईने नटलेल्या झेंड्यांनी वेधले लक्ष

राज्यासह परराज्यातही मागणी

अनिल जमधडे

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मेक इन औरंगाबाद’च्या इलेक्ट्रिक झेंड्यांनी लक्ष वेधले आहे. विद्युत रोषणाईने घरे, इमारती नटाव्यात तसे आता झेंडेही नटले आहेत. अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध होणाऱ्या या विद्युत झेंड्यांचा बोलबाला राज्याच्या विविध भागांत आणि कर्नाटकातही सुरू झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सध्या धूम सुरू आहे. शहरातील रिक्षा, चारचाकी वाहने तसेच घरांवर आणि इमारतींवरही निळ्या झेंड्यांची रेलचेल दिसत आहे. आता त्यात एक पाऊल पुढे टाकत विजय गायकवाड यांनी विद्युत रोषणाईने नटलेल्या निळ्या झेंड्यांची निर्मिती केली आहे. विद्युतीकरणाच्या या काळात झेंड्यालाही विद्युतीकरण करता येईल अशी कल्पना सुचल्यानंतर श्री. गायकवाड यांनी कामाला सुरवात केली. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी वेगवेगळे साहित्‍य गोळा केला. झेंड्यासाठी लागणारी लाईटिंग त्यांनी दिल्ली येथून मागवली, तर झेंडे मुंबई येथून मागवले आहेत. त्यासाठी लागणारी लेस शहरातील दुकानातून खरेदी केली आहे. झेंड्यांच्या तीनही बाजूने एलईडी लायटिंगची माळ जोडलेली आहे. त्याला सुरू ठेवण्यासाठी दोन पेन्सिल सेलचा वापर करण्यात आला आहे.

दमदार परफॉर्मन्स

विद्युत रोषणाईने नटलेल्या निळ्या झेंड्यांसाठी दोन पेन्सिल सेलची सोय केली आहे. विद्युत झेंडा सलग ७२ तास चालतो. केवळ रात्रीच्या वेळीच झेंडा लावला तर जवळपास सहा ते सात दिवस हा झेंडा विद्युतीकरणासह डौलाने फडकत राहतो. विशेष म्हणजे पाण्याने धुतल्यानंतही झेंड्याच्या लायटिंगवर कुठलाही परिणाम होत नाही. झेंड्याची लायटिंग ही प्लॅस्टिक कोटेड असल्याने झेंडा भिजला तरीही सुरूच राहतो.

माफक दरात उपलब्ध

विजय गायकवाड यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर झेंडे उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांच्या परिश्रमाने घरातील संगीता गायकवाड, उत्कर्ष, सांची, नक्षत्रा गायकवाड या सदस्यांच्या मदतीने हे झेंडे तयार केले आहेत. आतापर्यंत नागपूर, परभणी, नांदेड तसेच कर्नाटकातही हे झेंडा पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी झेंड्यासाठी एन-११, ए-७३-२, सुदर्शननगर हडको औरंगाबाद (मो. क्र. ७५०७२०९२०७, ९८९००५५५४१) यावर संपर्क साधावा असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT