गावकर्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल ग्रामपंचायतीने प्रसारमाध्यमांचे आभार मानले. तरी उर्वरीत शंभर ते दीडशे वानरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वैजापूर (जि.औरंगाबाद) : गारज (ता.वैजापूर) Vaijapur येथे गेल्या पंधरा दिवसांपासून एक पिसाळलेल्या वानराने Monkey काचेच्या वस्तु फोडण्याचा उच्छाद मांडला होता. त्यात वानराने केलेल्या हल्ल्यात अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याने घरात घुसून दुरदर्शन संच, कपाटाच्या काचा, आरशे, फोटो, चारचाकी वाहनाच्या काचा फोडुन पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच लहान मुलांसह महिला नागरिकांना जखमी करून दहशतीचे वातावरण तयार केले होते. अंभई येथील Aurangabad वनविभागाच्या Forest Department वन्यजीव प्राणीमित्र समाधान गिरी, कृष्णा गिरी, संदीप गिरी यांनी गुरुवार (ता.२४) सकाळी साडेसहा वाजता पिंजरा लावून जेरबंद केले. या पिसाळलेल्या वानराच्या भितीपोटी दरवाजे बंद करून घरात बसलेल्या महिला, दुकानदार वाहनधारक, लहान मुले, ग्नामस्थांना वानर जेरबंद करताच सुटकेचा निःश्वास सोडला.aurangabad latest news finally rabies affected monkey caged in vaijapur
याबाबत ग्रामपंचायतीने वनविभागास कित्येक वेळा निवेदन देऊन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता काही मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वन्यप्राण्यांचा त्रास सोसावा लागत असल्याचा सूर ग्रामस्थातून निघाला. याबाबत गावकर्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल ग्रामपंचायतीने प्रसारमाध्यमांचे आभार मानले. तरी उर्वरीत शंभर ते दीडशे वानरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.